गेमर्ससाठी खुशखबर, iQOO 15R मध्ये 7600mAh बॅटरी + 100W फास्ट चार्जिंग सोबत मार्केट मध्ये लॉन्च

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iQOO भारतीय मार्केटमध्ये नवीन पॉवरफुल स्मार्टफोन iQOO 15R  लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनला 24 फेब्रुवारीला लॉन्च करायची बातमी समोर येत आहे. कंपनीने या फोनच्या फिचर्स बद्दल खुलासा केलेला आहे. हा स्मार्टफोन फीचर्स मुळे खूप दमदार दिसत आहे. 

या स्मार्टफोन मध्ये Snapdragon 8 Gen 5 चिपसेट आणि मोठी बॅटरी दिलेली आहे. त्याचबरोबर हाय मेगापिक्सल चा कॅमेरा पण दिलेला आहे. लॉन्च होण्याआधीच या फोनची टेक यूजर मध्ये चर्चा चालू आहे या फोनची किंमत ₹45,999 रुपये असू शकते. 

iQOO 15R लॉन्च डेट आणि किंमत 

iQOO 15R स्मार्टफोनला भारतीय मार्केटमध्ये 24 फेब्रुवारी 2026 या तारखेला लॉन्च करण्याची संभावना आहे. लॉन्च झाल्यानंतर कंपनीचा हा डिव्हाइस ॲमेझॉन इंडिया आणि iQOO स्टोअरवर उपलब्ध राहील. सध्या कंपनीने कोणतेही सेलिंग डिटेल दिलेली नाही. 

परंतु लॉन्च झाल्यानंतर या स्मार्टफोनची त्वरित विक्री सुरू होईल. खूप सार्‍या रिपोर्टच्या मुताबिक या फोनच्या बेस वेरिएंट ची किंमत 45,999 रुपये असू शकते. या प्राइस रेंजमध्ये कंपनीने प्रीमियम युजर ला टार्गेट केलेले आहे.

iQOO 15R डिझाईन आणि लुक 

iQOO 15R स्मार्टफोनचे पहिले लुकसमोर आलेले आहे यामध्ये फोनचे बॅक साइड मध्ये स्क्वायर शेप चे कॅमेरा दिलेला आहे आणि त्याची बाजू गोल आहे. त्याचबरोबर या स्मार्ट फोन मध्ये डुअल रियर कैमरा सेंसर दिलेला आहे. ज्याच्यामुळे या फोनला अलगच ओळख मिळते. 

मागच्या बाजूने चेकर्स पैटर्न जसे डिझाईन बघायला मिळते जी या फोनला वेगळीच ओळख देते. या स्मार्टफोन मध्ये पावर बटन आणि वॉल्यूम रॉकर डाव्या साईटला दिलेला आहे. पूर्णपणे हा स्मार्टफोन मॉडेल लुक मध्ये बघायला मिळतो. 

iQOO 15R कॅमेरा आणि बॅटरी 

कॅमेरा सेटअप बद्दल सांगायचं झालं तर iQOO 15R मध्ये डुअल रियर कॅमेरा दिलेला आहे जे 200MP प्राइमरी सेंसर OIS सपोर्ट येण्याची संभावना आहे. 

त्याचबरोबर 8MP चे अल्ट्रा वाइड एंगल लेंस दिलेला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 32MP चे फ्रंट कॅमेरा मिळण्याचे संभावना आहे. 

या स्मार्टफोन मध्ये 7600mAh मोठे बॅटरी दिलेली आहे जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोन मध्ये दिलेली मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग यूज साठी खूप महत्त्वपूर्ण आहे. पूर्णपणे हा स्मार्टफोन परफॉर्मेंस आणि गेमिंग युजर साठी खूप उपयुक्त आहे. 

प्रोसेसर, RAM आणि सॉफ्टवेअर 

या स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर दिलेला आहे. या स्मार्टफोनमध्ये दिलेले चिपसेट हाई एंड परफॉर्मेंस आणि गेमिंग साठी ओळखली जाते. 

हा स्मार्टफोन पूर्णपणे गेमिंग युजरला टारगेट करून मार्केटमध्ये पेश केलेला आहे. 12GB RAM आणि 512GB इंटरनल स्टोरेज मिळण्याची संभावना आहे. 

ही डिवाइस OriginOS 6 वर चालेल जे Android 16 वर आधारित राहील. नवीन सॉफ्टवेअर स्मूदनेस आणि AI फीचर्स ने भरलेला आहे. 


हे पण वाचा 👇👇👇

iPhone विसरा, Samsung Galaxy S26 Ultra मध्ये मिळतेय जबरदस्त टेक्नॉलॉजी

10,001mAh बॅटरी सोबत लॉन्च झाला Realme P4 Power 5G, सिंगल चार्ज मध्ये चालेल 39 दिवस 


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment