
मित्रांनो शेतकरी हा जगाचा राजा आहे आणि शेतकरी आहे म्हणून आपण आहे म्हणून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना लागू केल्या आहे आणि त्याच बरोबर विविध योजना सुरू करण्याचे निर्णय महाराष्ट्र सरकार घेत आहे.
आज आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या 7 अशा महत्त्वपूर्ण सरकारी योजना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माहिती असायला पाहिजे आणि त्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यायला पाहिजे
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
पहिल्या नंबर वर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे. या योजनेची सुरुवात 1 डिसेंबर 2018 ला सुरू झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 हजार रुपये मिळत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची पात्रता शेतकरी भारताचा रहिवासी असायला पाहिजे. शेतकऱ्याची वय 18 पेक्षा जास्त असायला पाहिजे. आवेदन करण्यासाठी तुम्ही pmkisan.gov.in ऑफिशियल वेबसाइट वर जाऊ शकता.
सौर कृषी पंप योजना
सौर कृषी पंप योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना पंप अनुदना द्वारे उपलब्ध करून देणे असा आहे. योजनेच्या माध्यमातून 90% ते 95% शेतकऱ्यांना अनुदान पंप मिळतो. ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना डीजल आणि वीजे वर कमी अवलंबून राहावे लागेल आणि त्यामध्ये शेतकऱ्याचा खर्च पण कमी होईल.
नवीन वर्षाच्या अपडेट नुसार पंपाच्या संकेत वाढ होणार आहे आणि शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी गोरमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊ फ्रॉम बरु शकता.
पीएम फसल विमा योजना
पीएम फसल विमा योजन शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनचे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा रोगा मुळे शेताचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्या पिकाचे आर्थिक अनुदान देणे असा या योजनेचा उद्दिष्ट आहे. म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे नवीन अपडेट नुसार आवेदन प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे आणि नुकसान भरपाई 15 दिवसाच्या आत मध्ये भेटून जाईल
या योजनेचा प्रत्यक शेतकऱ्यांनी लाभ घ्यायला पाहिजे योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही गोरमेंटच्या pmfby.gov.in ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकता.
पशुधन विकास योजना
पशुधन विकास योजना हे भारत सरकारने राबवलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट पशुधन विकासाला बढावा द्यायचा आहे त्याचबरोबर या योजनेचे दुसरे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पशुपालकांना आणि शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्यता करायची आहे म्हणून भारत सरकारने ही योजना लागू केली आहे.
या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना गाय / म्हैस खरेदी करण्यासाठी अनुदान मिळाले म्हणून शेतकऱ्यांनी या योजनेचा पूर्णपणे लाभ घ्यायला पाहिजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय मध्ये जाऊन अर्ज करू शकता.
जलयुक्त शिवार अभियान योजना 2.0
जलयुक्त शिवार अभियान 2.0 योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे ही योजना सर्वात आधी साल २०१५-२०१९ दरम्यान यशस्वी झाल्यामुळे 2024 मध्ये पुन्हा लागू करण्यात आली आहे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे पाण्याची कमतरता कमी करणे, भूजल पातळी वाढवणे, दुष्काळ रोखणे आणि शेतीचे उत्पन्न वाढवणे असा आहे.
या योजनेचा लाभ कोणत्याही समुदायाच्या शेतकऱ्यांना होणार आहे (लहान मोठे) शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही या योजनेचा पूर्णपणे लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये किंवा तलाठी कार्यालय मध्ये जाऊन अर्ज करू शकता. तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.
माती परीक्षण योजना
माती परीक्षण योजना जी भारत सरकार ने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे जिला जी ‘मृदा आरोग्य कार्ड योजना’ म्हणून ओळखले जाते या योजनेची सुरवात १९ फेब्रुवारी २०१५ ला झाली आहे. या योजनेचा मुख्य उदिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना शेत जमिनीची आरोग्याविषयी तपासणी करणे असा आहे आणि योग्य खताचा वापर करून त्या जागेला सुपीक बनवणे असा या योजनेचा उदिष्ट आहे
शेतकऱ्यांनी माती परीक्षण केल्याने आणि योग्य खताचा वापर करून जमिनीला चांगले सुपीक बनवले तर शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होते आणि खर्च पण कमी होतो म्हणून सर्व शेतकऱ्यांनी माती परीक्षण योजनेचा पूर्णपणे लाभ घ्यायला पाहिजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कृषी विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.
शेतकरी कर्जमाफी योजना
महाराष्ट्र शासनाने चालू केलेली सर्वात महत्त्वपूर्ण योजनेमध्ये शेतकरी कर्ज माफी योजनाचे नाव सर्वात प्रथम येते या योजनेचा लाभ असा आहे की शेतकऱ्यांचे कर्ज घेतले ते माफ केले जाते आणि त्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठे आर्थिक मदत होते आणि शेतकऱ्याचा कर्ज पण कमी होतो.
म्हणून शेतकऱ्यांनी या योजनेचा पूर्णपणे लाभ घ्यायला पाहिजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेत जाऊन योजनेबद्दल माहिती काढावी आणि बँकेतच अर्ज करावा.
हे पण वाचा 👇👇👇
krushi Samruddhi Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी लाखो रुपये! अर्ज करण्याची LAST DATE जवळ!”
डीझेल पंपावर 50% अनुदान! शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा गिफ्ट … अर्ज कसा करायचा?