
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासना मार्फत विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्या योजना नागरिकांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर मुलींसाठी असतात.
गरीब वर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाने या योजना चालू केलेले आहे कारण अजूनही बऱ्याच ठिकाणी मुलीच्या जीवनाला जास्त प्राधान्य दिले जात नाही म्हणून ह्या योजनेचा लाभ देऊन मुलींना आरोग्य साठी, शिक्षणनासाठी आणि सामाजिक आर्थिक विकासासाठी शासनामार्फत आर्थिक मदत केली जाते.
म्हणून आज आपण दोन मुलींसाठी सरकारी योजना 2025 याबद्दल चर्चा करणार आहोत कारण दोन मुलींसाठी सरकार मार्फत काही योजना राबवल्या जातात त्या योजनेमधून एका कुटुंबात दोन मुली जन्माला आल्या त्या मुलींना प्रत्येक महिन्याला फिक्स राशी दिली जाते, Don Mulinsathi sarkari Yojana मिळणारे फिक्स राशी तुमच्या मुलींना कशी मिळेल हे जाणून घेण्यासाठी या आर्टिकल ला लक्षपूर्वक वाचा…
माझी कन्या भाग्यश्री योजना (Majhi Kanya Bhagyashree Yojana)
माझी कन्या भाग्यश्री योजना 1 एप्रिल 2016 पासून लागू करण्यात आलेली आहे. ही योजना आर्थिक दुर्बल मुलींच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे. ही योजना चालू करणे मागील महाराष्ट्र शासनाचे मुख्य उद्देश म्हणजे मुलींच्या आरोग्य, शिक्षणासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी चालू केलेले आहे.
जर एका कुटुंबात एक मुलगी आहे आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यावर त्या मुलीच्या खात्यावर शासनामार्फत 50,000 हजार रुपयाची राशी दिली जाते.
जर एका कुटुंबात दोन मुली आहेत आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यावर त्या दोन मुलीच्या खात्यावर प्रत्येकी 25,000 हजार रुपये म्हणजे एकूण 50 हजार रुपये दोघीच्या खात्यावर जमा केले जातात.
फायदे
✅ पहिली मुलगी जन्माला आल्यानंतर कुटुंब नियोजन केल्यास तिच्या नावावर 50,000 हजार रुपये जमा केले जातात.
✅ एका कुटुंबात दोन मुली जन्माला आल्यानंतर कुटुंब नियोजन केल्यानंतर प्रत्येकीच्या खात्यावर 25,000 हजार एकूण 50,000 आजार रुपये जमा केले जातात.
✅ या योजने मार्फत मुलींना 1 लाख रुपयाचा अपघात विमा मिळतो आणि बँक ऑफ महाराष्ट्र द्वारे लागू ओव्हरड्राफ्ट सुविधा ₹५,००० पण मिळतात.
पात्रता
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असायला पाहिजे.
✅ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न BPL तसेच APL ₹७.५ लाखापर्यंत असावे.
✅ या योजनेचा लाभ एका कुटुंबात 2 मुली झाल्यानंतर कुटुंब नियोजन पाले तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठराला. (एक मुलगी झाली आणि कुटुंब नियोजन पाले तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरला )
आवश्यक कागदपत्रे
या योजनेमध्ये आवेदन करण्यासाठी तुमच्याकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- मुलीचा जन्म नोंद प्रमाणपत्र
- कुटुंबाचे नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
- आधार कार्ड (मुलीचे पालकाची)
- बँक पासबुक झेरॉक्स
- उत्पन्नाचा दाखला
- पत्ता पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
अर्ज करण्याची पद्धत
✅ माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईट किंवा महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन फॉर्म भरावा लागेल.
✅ महिला व बाल विभागाच्या कार्यालयात जाऊन फॉर्म घेतल्यानंतर त्या फॉर्ममध्ये सर्व माहिती लक्षपूर्वक भरा.
✅ फॉर्म भरल्यानंतर आवश्यक ते कागदपत्रे जोडा जसे की आधार कार्ड, मुलीची जन्म नोंद प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, पत्त्याचा पुरावा इत्यादी
✅ सर्व फॉर्म भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर त्या फॉर्मला महिला बाल विकास विभागाच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्याकडे जमा करा.
लेक लाडकी योजना ( lek ladki yojana)
महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजना मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी १ एप्रिल २०२३ पासून लागू केलेली आहे ही योजना चालू करण्यामागे सरकारचे उद्देश म्हणजे मुलींना शिक्षण, आरोग्य मध्ये आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना राबवली जाते.
या योजनेमार्फत मुलगी जन्माला आल्यापासून तिचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत सरकार मार्फत आर्थिक सहाय्यता केली जाते म्हणजे मुलगी जन्माला आल्या नंतर तिला या योजने मार्फत 5,000 हजार रुपये दिले जाते.
त्यानंतर मुलीने 1ली, 6वी, 11वी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर अनुक्रमाने ₹4,000 , ₹6,000 ₹8,000 तिच्या बँक खात्यात जमा केले जातात आणि मुलीचे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये सरकार करून दिले जातात.
फायदे
✅ मुलगी जन्माला आल्या आल्या सरकारकडून आर्थिक मदत केली जाते.
✅ वरील प्रमाणे मुलगी शाळेत शिक्षण घेत असताना टप्प्या टप्प्याने तिच्या खात्यावर पैसे जमा होतात.
✅ मुलीचे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याचं बरोबर 10वी किंवा 12वी उत्तीर्ण झाले का तिच्या खात्यावर 75 हजार रुपये जमा केले जातात.
पात्रता
✅ अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹1 लाख रुपये पेक्षा कमी असायला पाहिजे.
✅ एका कुटुंबात दोन मुलीपर्यंतच्या योजनेचा लाभ मिळतो.
✅ अर्जदार मुलीची जन्म नोंद असणे आवश्यक आहे.
✅विवाह झालेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळत नाही.
✅ मुख्य म्हणजे ही योजना महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी साठी आहे.
आवश्यक कागदपत्रे
लेक लाडकी योजनेचा अर्ज करणाऱ्यांसाठी खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- अर्जदार मुलीचा जन्माचा दाखला
- आधार कार्ड (मुलीचे व पालकाचे)
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड किंवा रहिवासी दाखला
- शाळेमध्ये प्रवेश घेतलेला प्रमाणपत्र (पुढील राशी मिळवण्यासाठी)
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- मोबाईल नंबर
अर्ज करण्याची पद्धत
लेक लाडकी योजनेमध्ये आवेदन करण्यासाठी जवळच्या महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात किंवा अंगणवाडी संपर्क साधावा.
✅ महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जाऊन लेक लाडकी योजनेचा फॉर्म घेतल्यानंतर त्या फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरावी.
✅ फॉर्म मधील सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर त्या फॉर्मला आवश्यक ती कागदपत्रे जोडावी जसे की मुलीची जन्म नोंद पुरावा, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला इत्यादी
✅ त्यानंतर तो फॉर्म महिला व बाल विकास विभागाच्या कर्मचाऱ्याकडे जमा करावा.
✅ कागदपत्राचे तपासणी झाल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्रता ठरतात तर तुमच्या बँक खात्यावर प्रत्येक महिन्याला एक फिक्स राशी जमा केले जाईल.
Don Mulinsathi sarkari Yojana FAQ
Q. दोन मुलींसाठी सरकारी योजना काय आहे?
Ans: मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी शासना मार्फत दोन मुलींसाठी सरकारी योजना राबवल्या आहेत एका कुटुंबात 1 किंवा 2 मुली आहेत आणि कुटुंब नियोजन पाले असेल तर त्या कुटुंबाला सरकार आर्थिक मदत करत.
Q. दोन मुलींसाठी सरकारच्या कोणत्या योजना आहेत?
Ans : दोन मुलींसाठी महाराष्ट्र सरकार मार्फत लेक लाडकी योजना आणि माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे.
हे पण वाचा 👇👇👇
मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र
Post Office SSY Scheme : मुलीच्या नावावर जमा करा 24 हजार, मैच्योरिटी झाल्या वर मिळतील 11 लाख रुपये
Free Silai Machine Yojana 2025 : घरबसल्या शिलाई मशीन मोफत! फक्त 5 मिनिटांत करा अर्ज