
मित्रांनो तुम्ही पण स्पोर्ट बाईक घ्यायचा विचार करत आहात परंतु स्पोर्ट बाईक ची किंमत जास्त असल्यामुळे स्पोर्ट बाईक तुमच्या बजेटमध्ये बसत नाहीत. तर तुमच्यासाठी Hero Xtreme 160R स्पोर्ट बाईक एक चांगला विकल्प असू शकतो. ही बाईक Apache RTR 160 आणि Pulsar 160 बाईकच्या तुलनेत 15,000 ते 20,000 हजार रुपये सस्ती आहे.
Hero Xtreme 160R मायलेज
या बाईच्या फ्यूल एफिशिएंसी बद्दल सांगायचं झालं तर ही बाईक 47-50 kmpl च्या आसपास मायलेज देते. ही बाईक 12 लिटर फुल टॅंक कॅपॅसिटी सोबत येते या बाईची फ्यूल टैंक एक टाइम फुल केल्यानंतर ही बाईक 550+ किलोमीटर पर्यंत चालू शकते म्हणजे ही बाईक मायलेज मध्ये सुद्धा चांगली आहे आणि शहरी आणि गावी दोन्ही जागेवर ही बाईक कमी खर्च मध्ये जास्त चालू शकते.
Hero Xtreme 160R परफॉर्मेंस आणि इंजन
Hero Xtreme 160R मध्ये 163.2 cc चे BS6 फेज 2B कंप्लायंट एयर-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड इंजन दिलेले आहे. व्यंजन 15 PS चे पावर आणि 14 Nm टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर 5-स्पीड गियरबॉक्स सोबत स्मूद आणि रिफाइंड राइडिंग एक्सपीरियंस ऑफर करते. या बाईची टॉप स्पीड 115 kmph पर्यंत जाते. ही बाइक शहरी भागात व हाईवे वर चांगले परफॉर्मेंस देते.
Hero Xtreme 160R फीचर
ही बाईक फ्युचर मध्ये युवकांना आकर्षित करू शकते या बाईकमध्ये फुल LED हेडलैंप आणि टेललैंप, सिंगल-चैनल ABS, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, डिस्क ब्रेकआणि स्पोर्टी स्प्लिट सीट जसे फिशर दिलेले आहे.
या बाईचे कमी वजन आणि शार्प डिझाईन या बाईकला अलगच लुक देते. या बाईला ट्राफिक मध्ये चालवणे सोपे असते त्याचबरोबर या बाईकमध्ये युएसबी चार्जिंग बोर्ड आणि साईड स्टॅन्ड इंजन कट-ऑफ जसे फीचर पण दिलेले आहे.
किती आहे Hero Xtreme 160R किंमत
Hero Xtreme 160R बाईच्या किंमत बद्दल सांगायचं झालं तर या बाईकची एक्स शोरूम प्राईज ₹1,04,549 रुपये आहेत. या बाईकला EMI वर घेण्याचे ऑप्शन पण उपलब्ध आहे 3,587 हजार रुपये प्रति महिना EMI वर घेऊ शकता.
Hero Xtreme 160R बाईक का विकत घ्यावी
Hero Xtreme 160R बाईक त्या तरुणांसाठी शानदार बाईक आहे ज्या तरुणांना कमी किमतीमध्ये मजबूत ब्रँड स्टायलिश लुक चांगले मायलेज सोबत अफोर्डेबल पण पाहिजे. यंग जनरेशन साठी म्हणजेच कॉलेज स्टुडन्ट आणि यंग प्रोफेशनल्स यांच्यासाठी ही बाईक एक चांगला ऑप्शन असू शकते.
हे पण वाचा 👇👇👇👇
Bajaj Chetak C25 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, सिंगल चार्ज मध्ये 113KM रेंज आणि किंमत राहील एवढी
₹75,433 मध्ये Honda Activa 6G : एवढ्या कमी किमतीत भारताची No.1 स्कूटर – सगळेच चकित
महागड्या SUV परवडत नाहीत? Tata Punch Facelift फक्त ₹5.59 लाखात जबरदस्त फीचर्स देतो