
Honda Shine 125 भारतातील सर्वात जास्त विक्री होणारी 125cc ची बाईक आहे जी 2006 पासून आज पर्यंत तरुणांची पहिली आवड आहे. होंडा शाइन 125 सर्वात जास्त विक्री होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भरोसेमंद इंजन, मेंटेनन्स खर्च कमी त्याचबरोबर जबरदस्त फ्यूल एफिशिएंसी. 2025 मध्ये Honda Shine 125 ने खूप सारे नवीन अपडेट दिले होते जसे की USB Type-C चार्जिंग पोर्ट, Fully Digital Instrument Cluster आणि Wider Rear Tyre.
Honda Shine 125 किंमत
Honda Shine 125 बाईक ची एक्स शोरूम किंमत ₹78,789 हजार रुपये पासून सुरू होते, Drum Brake बेस वेरिएंट ची किंमत ₹84,493 मध्ये उपलब्ध आहे आणि डिस्क ब्रेक टॉप वेरिएंट ची किंमत ₹89,245 हजार रुपये आहे. दिल्लीमध्ये या बाईक ची ऑन रोड किंमत ₹95,000 ते ₹1,02,000 हजार रुपये बघायला मिळेल GST 2.0 नंतर या बाईच्या किमतीमध्ये 6,000 हजार रुपयाचे कटौती बघायला मिळाले आहे.
होंडा शाइन 125 ची किंमत हिरो स्प्लेंडर प्लस पेक्षा थोडी जास्त आहे परंतु फीचर आणि रिफाइनमेंट हे पूर्णपणे व्हॅल्यूबल आहे.
Honda Shine 125 मायलेज आणि फ्युल
होंडा शाइन 125 बाईकच्या मायलेज बद्दल सांगायचं झालं तर होंडा शाइन 125 शानदार मायलेज देणारी बाईक आहे. Shine 125 ARAI सर्टिफाइड 65+ KMPL पर्यंत मायलेज देते. शहरी भागामध्ये 52-55 KMPL मायलेज देते आणि हवेवर स्थिर गतीने चालवले तर 60-65 KMPL पर्यंत मायलेज देऊ शकते. जर एका वेळी 10.5 लिटर फुल टॅंक केली तर ही बाईक 550-600 किमी पर्यंत चालू शकते. होंडा शाइन 125 एक चांगली मायलेज देणारी बाईक आहे म्हणून मोठ्या प्रमाणात या बाईकची विक्री होते आणि सर्वात जास्त याच बाईकला पसंत केले जाते.
Honda Shine 125 इंजन 123.94cc चे
Honda Shine 125 मध्ये सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड इंजन दिले आहे जे 10.74 PS पावर @ 7,500 RPM आणि 11 Nm टॉर्क @ 6,000 RPM देते. इंजन चा सर्वात मोठा फायदा रिफाइनमेंट आहे. हे इंजन स्मूथ चालते वाइब्रेशन न्यूनतम होत.
या बाईकचा एक्सेलेरेशन फास्ट नाही परंतु दैनिक रायडिंग साठी पुरेस आहे इंजन बिल्ड क्वालिटी एकदम चांगली आहे जी खूप वर्षापर्यंत चालू शकते.
होंडा शाइन 125 ब्रेक्स आणि सुरक्षा
होंडा शाइन 125 च्या Drum वेरिएंट मध्ये फ्रंट आणि रियल दोन्ही 130mm ड्रम ब्रेक्स दिलेले आहे. Disc वेरिएंट मध्ये 240mm डिस्क ब्रेक दिले आहे. या बाईचे ब्रेकिंग सिस्टम परफॉर्मन्स चांगला आहे. त्याचबरोबर Headlamp Pass Switch आणि Side Stand Engine Cut-Off जसे सुविधा दिलेली आहे.
Honda Shine 125 EMI आणि फायनान्स विकल्प
होंडा शाइन 125 ला EMI वर पद्धतीने विकत घेऊ शकता. या बाईकला तुम्ही 1,465 ते 2,500 रुपये मासिक EMI वर विकत घेऊ शकता. परंतु तुम्हाला डाऊन पेमेंट मध्ये 10000 ते 20000 हजार रुपये द्यावे लागतील. या बाईक ला तुम्ही एक्सचेंज ऑफरवर सुद्धा घेऊ शकता जुन्या बाईकला एक्सचेंज करून तुम्हाला 5,000 ते 10,000 हजार रुपये पर्यंत डिस्काउंट मिळू शकते.
हे पण वाचा 👇👇
महागड्या SUV परवडत नाहीत? Tata Punch Facelift फक्त ₹5.59 लाखात जबरदस्त फीचर्स देतो
SUV घ्यायची घाई थांबवा! Tata Sierra 2026 मध्ये मिळतंय जबरदस्त फिचर्स पॅक
मकर संक्रांत स्पेशल: Ladki Bahin Yojana 2026 मध्ये महिलांना थेट ₹3000 – लगेच तपासा