
मैत्रीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी भारतीय रेल्वे वित्त महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये असिस्टंट आणि असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) या पदासाठी 23 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IRFC Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 04 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 मे 2026 या तारखेला 11:45 PM पर्यंत अर्ज करू शकता इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
भारतीय रेल्वे वित्त महामंडळ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षिणक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : भारतीय रेल्वे वित्त महामंडळ
एकूण पदसंख्या : 23 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : असिस्टंट आणि असिस्टंट मॅनेजर (फायनान्स)
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹21,000 ते ₹74,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
IRFC Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC/EWS | ₹500 |
| SC/ST/ExSM/ट्रांसजेंडर | शुल्क नाही |
IRFC Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 4 एप्रिल 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 1 मे 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीद्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| असिस्टंट | 16 | B.Com + ICAI / ICMAI कडून मध्यवर्ती परीक्षा उत्तीर्ण |
| असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) | 07 | B.Com + ICAI / ICMAI कडून CA/CMA किंवा MBA (Finance) / PG डिप्लोमा |
IRFC Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारतीय रेल्वे वित्त महामंडळ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply IRFC Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय रेल्वे वित्त महामंडळ भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली भेटून जाईल. खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल.
स्टेप 2 : लिंक वर क्लिक केल्यानंतर. To Register या ऑप्शनवर क्लिक करा.
स्टेप 3 : त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 5 : शेवटी अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
स्टेप 6 : अर्ज फार्मची प्रिंट काढून ठेवा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
पंजाब & सिंध बँकेत 1000 पदांसाठी बंपर भरती 2026