पीएम किसान सन्मान निधी योजना 2025 | PM Kisan Samman Nidhi Yojana 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांनी PM Kisan Samman Nidhi Yojana 2025 चे नाव तर ऐकलं असेल भारत सरकारची शेतीप्रधान कल्याणकारी योजना आहे या योजनेची सुरुवात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यता पुरवण्यासाठी सुरू केलेली सरकारी योजना आहे. शेतकऱ्यांना पीक खर्च कमी करणे आणि शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, औषधे खरेदी करण्यास आर्थिक सहायता करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

लहान आणि सीमांत शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकता लाभार्थी शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते ₹6,000 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जाता (प्रत्येकी ₹2,000 रुपये) याचा वापर करून शेतकरी बियाणे, खते व औषधे खरेदी करू शकतो.

पीएम किसान सन्मान निधी योजने मार्फत देशातील 14.5 करोड़ अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे जर तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची आवश्यक पात्रता काय पाहिजे, अर्ज कसा करावा अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…

PM Kisan Samman Nidhi Yojana 2025

योजनेचे नाव पीएम किसान सन्मान निधी योजना
कोणी सुरू केलीभारत सरकार
लाभ6000 रुपये दरवर्षी
वय मर्यादा18 वर्षां पुढील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकता. 
उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहायता ठरवण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
ऑफिशियल वेबसाईटhttps://pmkisan.gov.in


पीएम किसान सन्मान निधी योजनेचे उद्देश 

पीएम किसान सन्मान निधी योजनेचे काही उद्देश खालील प्रमाणे. 

लहान व सीमांत शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात दरवर्षी 6,000 हजार रुपयाची आर्थिक सहायता देऊन शेतकऱ्यांना बियाणी, खते, औषध इत्यादी गोष्टी खरेदी करण्यासाठी मदत देणे आणि शेतकऱ्यांना लहानशा गोष्टीसाठी कर्ज घ्यावा लागू नये, शेतकऱ्याचा शेती करण्यासाठी आत्मविश्वास वाढवून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे म्हणून शेतकऱ्यांनी या योजनेचा पूर्णपणे फायदा घ्यावा.

पीएम किसान सन्मान निधी योजने साठी पात्रता 

पीएम किसान सन्मान निधी योजने मध्ये  काही पात्रता ठरविण्यात आलेली आहे खालील सर्व पात्रता अर्जदार नागरिकांकडे असणे आवश्यक आहे तेव्हाच अर्ज करता येईल. 

✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ सर्व लहान व सीमांत शेतकरी यांच्या नावावर 2 हेक्टर (5 एकर) जमीन आहे ते या योजनेसाठी पात्र आहे. 

✅ अर्जदार स्वतः शेत जमिनीचा मालक असला पाहिजे. 

✅ 18 वर्षांपुढील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. 

पीएम किसान सन्मान निधी योजने मधील अपात्र शेतकरी

  • भारत सरकारने काही शेतकऱ्यांना लाभ देण्यास वगळले आहे. 
  • ग्रामपंचायत, संस्था किंवा सरकारी जमिनीचे शेतकरी लाभ घेण्यास अपात्र आहे. 
  • रिटायर शासकीय कर्मचारी ज्यांची मासिक पेन्शन योजना ₹10,000 हजार रुपये आहे ते या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे. 
  • इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी पण योजनेसाठी अपात्र आहे.
  • वकील, डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, सीए, तसेच प्रोफेशनल इत्यादी व स्वतःचा व्यवसाय चालवणारे नागरिक या योजनेसाठी अपात्र आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजने चे फायदे 

पीएम किसान सन्मान निधी योजने मार्फत शेतकऱ्यांना मिळणारे फायदे खालील प्रमाणे.

✅ शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 हजार रुपये बँक खात्यात जमा केले जातात. 

✅ मिळणारी रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. (प्रत्येकी 2000 हजार रुपये)

✅ शेतकऱ्यांना बियाणे खर्च इत्यादी औषधे घेण्यासाठी खर्चासाठी मदत मिळते. 

✅ शेतकऱ्यांना कर्जावर अवलंबून राहावे लागत नाही. 

✅ आर्थिक सहायता मिळाल्यामुळे शेतकऱ्याचे आत्मविश्वास वाढतो आणि उत्पादनक्षमता पण वाढते

PM Kisan Samman Nidhi Yojana 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

पीएम किसान सन्मान निधी योजने मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्याकडे खाली सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा शेतकरी सोप्या पद्धतीने योजने मध्ये अर्ज करू शकतो. 

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स 
  • जमिनीचा 7/12 उतारा 
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईझ फोटो 
  • मोबाईल क्रमांक

How To Apply PM Kisan Samman Nidhi Yojana 2025 online (अर्ज करण्याची पद्धत)

पीएम किसान सन्मान निधी योजने मध्ये अर्जदार तीन पद्धतीने अर्ज करू शकतो ऑफलाइन, ऑनलाईन आणि Mobile App च्या माध्यमातून आम्ही तिन्ही पद्धती इथे सांगणार आहे. 

पीएम किसान सन्मान निधी योजने मध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत

स्टेप 1 : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी नागरिकांना PM Kisan Portal ( https://pmkisan.gov.in) या वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : वरील वेबसाईटचे होम पेजवर गेल्यानंतर Farmers Corner या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 3 : त्यानंतर New Farmer Registration या ऑप्शन वर क्लिक करा.

स्टेप 4 : तुमचा आधार क्रमांक टाकून Click Here to Continue या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 5 : त्यानंतर शेतकऱ्याची आवश्यक माहिती जसे की शेतकऱ्याचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, बँक खाते क्रमांक, IFSC Code सर्व माहिती भरा. 

स्टेप 6 : सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करून फॉर्म सबमिट करा. 

जर तुम्ही या योजनेसाठी पात्रता ठरता तर मोबाईल मॅजेस द्वारे कन्फर्मेशन केला जाईल.

पीएम किसान सन्मान निधी योजने मध्ये ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत

पीएम किसान सन्मान निधी योजने मध्ये नागरिक ऑफलाइन पद्धतीने पण अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी नागरिकांना सर्वात आधी जवळच्या Common Service Center, तलाठी कार्यालय किंवा कृषी विभाग कार्यालयात मध्ये जाऊन अर्ज फॉर्म घ्यावा लागेल. 

अर्ज फॉर्म घेतल्यानंतर अर्ज होम मध्ये सर्व माहिती लक्षपूर्वक भरावी त्याचबरोबर त्या फॉर्मला आवश्यक कागदपत्रे जोडावे जसे की आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक झेरॉक्स सातबारा उतारा इत्यादी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर अर्ज फॉर्म कार्यालयात जमा करायला. 

त्यानंतर तुमची ऑनलाईन नोंदणी केली जाईल आणि तुम्हाला एक अर्जाची पावती दिली जाईल. 

जर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरतात तर बँक खात्यात पैसे जमा केले जातील.

पीएम किसान सन्मान निधी योजने मध्ये PM Kisan Mobile App द्वारे अर्ज

पीएम किसान सन्मान निधी योजने मध्ये Mobile App द्वारे अर्ज करण्यासाठी सर्वात आधी गुगल प्ले स्टोअरवरून PM Kisan Mobile App डाउनलोड करा. 

ॲप डाऊनलोड झाल्यानंतर ॲप मध्ये जाऊन “New Farmer Registration” या ऑप्शन वर क्लिक करा. 

त्यानंतर आधार क्रमांक टाकून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा.




FAQ PM Kisan Samman Nidhi Yojana 2025

Q. किसान सन्मान निधीसाठी कोण पात्र आहे?

Ans : किसान सन्मान निधीसाठी भारतातील लहान आणि सीमांत शेतकरी पात्र आहेत. 

Q. किसान सन्मान निधीसाठी नोंदणी कशी करावी?

Ans : किसान सन्मान निधी योजनेमध्ये नागरिक तीन पद्धतीने नोंदणी करू शकता ऑनलाइन, ऑफलाइन आणि ॲपच्या माध्यमातून. तिन्ही पद्धती वरती सांगितल्या आहे.



हे पण वाचा 👇👇👇

छत्रपती शिवाजी महाराज योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 

ई-श्रम कार्ड पेन्शन योजना, ₹3000 रुपये प्रत्येक महिन्याला

प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना ₹3000 हजार रुपये पेन्शन योजना सुरू





शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment