
Realme P4 Power 5G : भारतीय बाजार मध्ये सर्वात मोठे बॅटरी असलेला फोन लॉन्च झालेला आहे. चीनी स्मार्टफोन मेकर ने सर्वात जास्त मोठी बॅटरी असलेला फोन लॉन्च केलेला आहे या फोनमध्ये 10001mAh बॅटरी येते. या फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा, दमदार बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळते. त्याचबरोबर या फोनमध्ये 12GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेज दिलेला आहे.
कंपनीचा दावा आहे की हा फोन सिंगल चार्जमध्ये 39 दिवसापर्यंत चालू शकतो. चला तर मग जाणून घेऊया फोनची किंमत काय आहे या फोनमध्ये काय फीचर आहे आणि हा फोन कसा घ्यावा सर्व माहिती जाणून घेऊया.
Realme P4 Power 5G किंमत आणि वेरिएंट
Realme P4 Power 5G फोनची सुरुवाती किंमत ₹25,999 रुपये ठेवलेली आहे. जे ग्राहक या फोनची सुरुवातिला खरेदी करतील त्यांना ₹2000 हजार रुपये डिस्काउंट मिळेल डिस्काउंट मिळाल्यामुळे या फोनची किंमत ₹23,999 रुपये होऊ शकते.
8GB RAM + 128GB स्टोरेज ₹25,999 रुपये किंमत आहे. 8GB RAM + 256GB स्टोरेज: ₹27,999 रुपये आहे. आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज: 30,999 रुपये आहे
Realme P4 Power 5G सेल आणि ऑफर्स
या फोनच्या विक्री 05 फेब्रुवारी पासून Flipkart, Realme ऑफिशियल वेबसाईट आणि ऑफलाइन स्टोर्स वर होणारा आहे. कंपनीने या फोनच्या बॅटरीवर 04 वर्षाची बॅटरी वारंटी दिलेली आहे. त्याचबरोबर 6 महिने नो-कॉस्ट EMI आणि ₹1,000 रुपये एक्सचेंज बोनस पण देऊ राहिले. हा फोन TransSilver, TransOrange आणि TransBlue कलर मध्ये उपलब्ध आहे.
बॅटरी आणि चार्जिंग टाईम
Realme P4 Power 5G फोन मध्ये दिलेली 10,001mAh ची बॅटरी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते त्याच बरोबर 27W रिवर्स चार्जिंग पण आहे. ज्याच्यामुळे हा फोन पावर बँक चे काम करेल म्हणजे दुसऱ्या डिव्हाइसला पण चार्ज करू शकतो.
डिस्प्ले आणि कॅमेरा
या फोनमध्ये 6.8-इंच ची 1.5K AMOLED 144Hz डिस्प्ले दिलेला आहे ज्याची ब्राईटनेस 500 निट्स पर्यंत कॅमेरे बद्दल सांगायचं झालं तर या फोनमध्ये 50MP Sony सेंसर दिलेला आहे. हा फोन पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे आणि या फोनला , IP68 आणि IP69 रेटिंग दिलेली आहे.
Realme P4 Power 5G परफॉर्मेंस
या फोनमध्ये MediaTek Dimensity 7400 Ultra प्रोसेसर आणि AI चिप दिलेली आहे. कंपनीचा दावा आहे की या फोनमध्ये गेमिंग करते वेळेस फ्रेम रेट खूप चांगला असतो आणि बॅटरी पण उतरत नाही. या फोनमध्ये गेमर्स BGMI जसे गेम 90fps वर खेळू शकता.
हे पण वाचा 👇👇