
Yamaha ने भारतीय टू व्हीलर इलेक्ट्रिक मार्केटमध्ये पहिला इलेक्ट्रिक स्कूटर Yamaha EC-06 लॉन्च केलेला आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटर ला River Mobility सोबत पार्टनरशिप मध्ये डेव्हलप केलेले आहे आणि हे इलेक्ट्रिक स्कूटर River Indie वर बेस्ड आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत ₹1,67,600 रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर ला सुरुवातीला काही शहरांमध्ये यामाहा च्या ब्लू स्क्वायर प्रीमियम डीलरशिप सोबत विकले जाईल.
Yamaha EC-06 Electric Scooter price (किंमत)
Yamaha EC-06 एक्स शोरूम किंमत ₹1,67,600 रुपये आहे. हे इलेक्ट्रिक स्कूटर प्रीमियम सेगमेंट मध्ये येते ज्यामध्ये Ola, TVS iQube आणि Ather जसे इलेक्ट्रिक स्कूटर शी सामना करणार आहे. ही किंमत सरकारी सबसिडी आणि PLI स्कीम सोबत कमी होऊ शकते. अलग अलग राज्याची सरकार या इलेक्ट्रिस स्कूटर खरेदीवर सबसिडी पण देऊ शकते.
Yamaha EC-06 Electric Scooter फीचर्स
ही इलेक्ट्रिक स्कूटर ऍडव्हान्स फीचर सोबत लॉन्च करण्यात आलेली आहे यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सोबत मोबाईल ॲप इंटीग्रेशन आहे. ज्यामध्ये रायडर्स राइडर नेविगेशन, कॉल अलर्ट, लोकेशन ट्रैकिंग आणि बैटरी स्टेटस बघू शकता.
त्याचबरोबर या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एलईडी लाइटिंग, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, स्मार्ट चार्जिंग ऑप्शंस आणि रिवर्स मोड पण दिलेला आहे त्याचबरोबर ब्रेकिंग सिस्टम मध्ये डबल डिस्क ब्रेक दिलेला आहे. जे सुरक्षित स्टॉपिंग देतात.
Yamaha EC-06 डिझाईन
Yamaha EC-06 Electric scooter चे डिझाईन मॉडर्न, स्पोर्टी आणि प्रीमियम आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर River Indie शी इंस्पायर्ड आहे. परंतु Yamaha कंपनीने या स्कूटरला वेगळे दावले आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फ्यूचरिस्टिक LED हेडलाइट्स, फुल LED लाइटिंग सिस्टम, डे-टाइम रनिंग लाइट्स (DRL), मोठा LCD डिस्प्ले आणि स्मार्ट कनेक्टिविटी जसे अनेक फीचर्स दिलेले आहे. या स्कूटरची बॉडी तरुणांना आकर्षित करू शकते कारण ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे मॉर्डन लूकमध्ये दिसते.
या स्कूटरमध्ये स्टोरेज पण दिलेला आहे जे 24.5 लीटर आहे ज्या मध्ये लहान वस्तू जसे की हेल्मेट आणि अजून काही छोटे वस्तू ठेवू शकता.
या स्कूटरमध्ये दिलेले डबल डिस्क ब्रेक्स, ट्यूबलेस टायर्स आणि चांगले ग्राउंड क्लिअरन्स या स्कूटरला शहरी रस्त्यावर आणि ऑफ रोडिंग साठी उपयुक्त बनवते. त्याचबरोबर या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तीन रायडींग मोड्स पण दिलेले आहे जसे की Eco, Normal, Sport जे परफॉर्मेंस आणि रेंजला बॅलन्स करतात.
Yamaha EC-06 Battery, Motor, Range
Yamaha EC-06 मध्ये 4kWh ची बॅटरी पॅक दिलेला आहे जे BLDC मोटर सेशी जोडलेला आहे. या मोटरची पिक पावर 6.7 kW इतकी आहे आणि 26 Nm चे टॉर्क जनरेट करते.
ही इलेक्ट्रिक स्कूटर 169 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते आणि या स्कूटरचे टॉप स्पीड 79-90 किलोमीटर प्रति घंटा आहे. या स्कूटरमध्ये दिलेली बॅटरी 8 तासात फुल चार्ज होऊ शकते आणि या बॅटरीवर तीन वर्षाची वारंटी पण दिलेली आहे.
हे पण वावा 👇👇👇
Yamaha Electric Bike : 380KM रेंज, टॉप स्पीड 120 Km/h, घरी आना फक्त ₹2,999 EMI वर