
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी सीमा रस्ते संघटनेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे सीमा रस्ते संघटनेत विविध पदांसाठी 542 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. BRO Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 20 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
सीमा रस्ते संघटना भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : सीमा रस्ते संघटना.
एकूण पदसंख्या : 542 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : विविध पदे.
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क : General/OBC/EWS/ExSM : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹50 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि SC/ST या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 20 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता + वय मर्यादा
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता | वय मर्यादा |
|---|---|---|---|
| व्हेईकल मेकॅनिक | 324 | 10वी पास, मोटर व्हेईक, इंजिनमध्ये मेकॅनिकचे प्रमाणपत्र, ITI | 18 ते 27 वर्षे |
| पेंटर | 13 | 10वी पास, ITI | 18 ते 25 वर्षे |
| MSW (DES) | 205 | 10वी पास, ITI (मोटर, व्हीकल, ट्रॅक्टर, मेकॅनिकल) | 18 ते 25 वर्षे |
सीमा रस्ते संघटना भरती 2025 पात्रता
सीमा रस्ते संघटना भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 27 वर्ष वय असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- वरील प्रमाणे 10वी पास, ITI पास असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
BRO Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply BRO Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
सीमा रस्ते संघटना भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन अर्ज करा किंवा त्या पत्त्यावर अर्ज पाठवा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : कमांडंट बीआरओ स्कूल अँड सेंटर, दिघी कॅम्प, पुणे-४११०१५
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म कार्यालयात जमा करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
Jalgaon DCC Bank Bharti 2025 : जलगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत तब्बल 220 पदांची मोठी भरती सुरू
मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये 10 रिक्त पदांसाठी भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
BRO Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू