BEL Pune Recruitment 2025 : पात्रता, वयमर्यादा, अर्ज प्रक्रिया पूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे येथे अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ सी या पदासाठी 38 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. BEL Pune Recruitment 2025 

जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 25 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे

एकूण पदसंख्या : 38 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ सी

नोकरीचे स्थान : पुणे (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून तीन वर्षाची इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केलेला असावा आणि संबंधित ट्रेडमध्ये राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रमाणपत्रासह एक वर्षाचे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण किंवा संबंधित ट्रेडमध्ये SSLC + 3 वर्षांचा अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : UR/OBC(NCL)/EWS या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 590 अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC/ST/PwBD/ या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी या पदासाठी ₹24,500 ते ₹90,000 मासिक वेतन दिले जाईल आणि तंत्रज्ञ सी या पदासाठी ₹21500 ते ₹82000 मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 25 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आम्ही 16 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे भरती 2025 पात्रता 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • १८ ते ३८ वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


BEL Pune Recruitment 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply BEL Pune Recruitment 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना jobapply.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर “Apply” या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

TIFR Mumbai Bharti 2025: मुंबईत सरकारी नोकरीची संधी, पात्रता, पगार व अर्ज लिंक येथे पहा

RRB JE Bharti 2025 : रेल्वेमध्ये तब्बल 2570 जागांची मेगा भरती सुरू, लगेच अर्ज करा

BEL Bharti 2025 : 340 पदांसाठी नवी भरती जाहीर – आजच अर्ज करा




अंतिम शब्द 

BEL Pune Recruitment 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment