छत्रपती शिवाजी महाराज योजना 2025 | Chhatrapati Shivaji Maharaj Sanman Yojana 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतं जेणेकरून सरकार शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक सहायता बरोबर शेती करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकेल याच उद्देशाने महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. Chhatrapati Shivaji Maharaj Sanman Yojana 2025 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना देवेंद्र फडवणीस यांनी चालू केलेली महाराष्ट्र सरकारची कर्जमाफी सरकारी योजना आहे या योजने मार्फत शेतकऱ्यांची पीक कर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज इत्यादी कर्ज माफ केले जाते. 

या योजना मार्फत खूप शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहेत जर तुम्हाला पण या योजना मार्फत कर्जमाफ करायचं असेल तर योजनांमध्ये कर्जमाफी करण्यासाठी आवश्यक पात्रता काय पाहिजे, अर्ज कसा करावा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा… 

Chhatrapati Shivaji Maharaj Sanman Yojana 2025 

योजनेचे नावछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार (उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)
लाभ1,50,000 लाखो पर्यंत कर्ज माफ.
वय मर्यादा18 वर्षे 
उद्देश शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून आर्थिक सहाय्यता करणे आणि शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणे.


छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे उद्देश 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे उद्देश खालील प्रमाणे. 

शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देऊन आर्थिक सहायता देणे. 

शेतकऱ्याला शेती करताना येणाऱ्या अडचणी, हवामानातील बदल, उत्पन्नातील घट यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात घट होते आणि शेतकरी निराश होतो त्यांना आधार देण्यासाठी या योजनेचा मोठा हातभार आहे. 

शेतकऱ्यांनी घेतलेला कर्जाचा भार कमी करणे. 

आर्थिक सहायता मिळाल्यामुळे शेतकऱ्याला खते बियाणे औषधे विकत घेण्यासाठी सोपे होते. 


छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने साठी पात्रता 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने  मध्ये अर्ज करणाऱ्या नागरिकाकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे तेव्हाच उमेदवार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरेल. 

✅ अर्जदार शेतकरी महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅ अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. 

✅ 18 वर्षे पुढील शेतकरी या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

✅ टॅक्स भरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरत नाही. 

✅ ज्या कुटुंबातील एखादा सदस्य शासकीय कर्मचारी असेल त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जात नाही. 

✅ अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर बँक खाते असणे आवश्यक आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे फायदे

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे फायदे पुढील प्रमाणे. 

✅ योजनेमार्फत मिळणारे आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक अकाउंट मध्ये जमा केली जाते. 

✅ शेतकऱ्यांच्या कर्जफेडस हातभार लागतो. 

✅ शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशके, औषधे इत्यादी गोष्टी खरेदी करण्यासाठी मदत मिळते. 

✅ शेतकऱ्याचे शेत उत्पादन क्षमता वाढते. 

✅ शेतकऱ्याचा शेती करण्यासाठी आत्मविश्वास वाढतो. 

✅ शेतकऱ्यांच्या कर्जफेडमध्ये हातभार आल्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारते. 

✅ शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळतो. 

✅ लाभ घेतल्यामुळे शेतकरी थेट सरकारी योजने शी जोडला जातात.


छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने मधील अटी व शर्ती 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने काही अटी व शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत खालील प्रमाणे. 

  • अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असावी आणि  शेतकरी असावा. 
  • एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ दिला जातो. 
  • टॅक्स भरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाही. 
  • लाभार्थ्याच्या कुटुंबातील एखादा सदस्य शासकीय कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी असेल तर त्याला लाभ दिला जाणार नाही. 
  • आधार कार्ड बँक अकाउंट ला लिंक असणे अनिवार्य आहे. 
  • अर्ज फॉर्म मध्ये बनावटी कागदपत्रे दिल्यास नागरिकावर कारवाई केली जाईल. 
  • ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जमीन आहे त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. 
  • ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्या शेतकऱ्यांना पुन्हा योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

Chhatrapati Shivaji Maharaj Sanman Yojana 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्याकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा शेतकरी या योजनेमध्ये सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतो. 

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड
  • 7/12 उतारा
  • बँक पासबुक झेरॉक्स 
  • रहिवासी प्रमाणपत्र 
  • कुटुंबातील सदस्यांची माहिती 
  • मोबाईल नंबर 

How To Apply Chhatrapati Shivaji Maharaj Sanman Yojana 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने मध्ये अर्जदार नागरिक ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो. 

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत 

स्टेप 1 : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत योजना पोर्टल उघडा.

स्टेप 2 : पोर्टल उघडल्यानंतर “Apply Now” या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली शेतकऱ्याची संपूर्ण माहिती भरा जसे की नाव, पत्ता, जन्मतारीख, आधार नंबर, मोबाईल नंबर इत्यादी. 

स्टेप 4 : त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी. 

स्टेप 5 : अर्ज फॉर्म भरल्यानंतर सर्व माहिती पुन्हा तपासून घ्या त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा. 

स्टेप 6 : अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची एक प्रिंट काढून ठेवा. 

अशाच प्रकारे नागरिक या योजनेमध्ये अर्ज करू शकता. 


ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने मध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तालुका किंवा जिल्हास्तरीय कृषी कार्यालयात जाऊन अर्ज फ्रॉम घ्यावा. 

अर्ज फॉर्म घेतल्यानंतर अर्धा फ्रॉम मध्ये विचारलेली सर्व माहिती नीट भरावी त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडावी. 

अर्ज फॉर्म भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर अर्ज  फॉर्म कार्यालयात जमा करून द्या.

अर्जाची पावती किंवा रसीद मिळवा.


FAQ 

Q. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमार्फत किती कर्ज माफ केला जातो? 

Ans :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमार्फत शेतकऱ्यांचा 1.50 लाख रुपयाचा कर्ज माफ केला जातो.



हे पण वाचा 👇👇👇

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2025 पात्रता, लाभ आणि अर्ज प्रक्रिया

ई-श्रम कार्ड पेन्शन योजना, ₹3000 रुपये प्रत्येक महिन्याला

प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना ₹3000 हजार रुपये पेन्शन योजना सुरू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment