
मित्रांनो मुलींच्या उज्वल भविष्यासाठी भारत सरकार विविध योजना राबवत असतं जेणेकरून सरकार या योजनेच्या माध्यमातून मुलींना आर्थिक मदत करून त्यांचे भविष्य उज्वल घडवण्यासाठी आर्थिक मदत करू शकेल. म्हणून सरकार मुलींसाठी विविध योजना राबवत असतं. Mulinsathi Sarkari Yojana 2025
अशा बऱ्याच योजना आहे ज्या मुलींना माहीतच नाही म्हणून मुलींना या योजनेचा पूर्णपणे फायदा घेता येत नाही आणि त्या या फायद्यापासून वंचितच राहून जातात. म्हणून आज आम्ही मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र 2025 बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. या आर्टिकल ला शेवटपर्यंत लक्षपूर्वक वाचा जेणेकरून तुम्हाला या सर्व योजना बद्दल माहिती होईल…
सुकन्या समृद्धी योजना ( sukanya samriddhi yojana)
Mulinsathi Sarkari Yojana या लिस्ट मध्ये पहिल्या नंबर ला सुकन्या समृद्धी योजना आहे जी भारत सरकारच्या माध्यमातून राबवली जाते ही योजना मुलींच्या भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे. या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी 2015 रोजी करण्यात आली होती.
या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या नावावर पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडले जाते मुलीचे वय 10 वर्ष पूर्ण असायला पाहिजे
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते खोलल्यानंतर आई-वडिलांनी मुलीच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला एक फिक्स अमाऊंट भरावी लागते तुम्ही प्रत्येक महिन्याला 250 रुपये पासून भराया सुरुवात करू शकतात तर 1500 हजार रुपये जमा करू शकत. ही जमा रक्कम तुमची मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मुलीच्या पुढील शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी काढू शकता.
फायदे
✅ जमा केलेल्या पैशावर 8 टक्के व्याजदर मिळतो जे बँकेच्या व्याजदर अपेक्षा जास्त आहे.
✅ तुम्ही जमा केलेल्या पैशावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही.
✅ मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जमा केलेले पैसे काढू शकता.
✅ मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्नासाठी तुम्ही 50% टक्के रक्कम काढू शकता.
पात्रता
✅ मुलीचे वय 10 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
✅ एक कुटुंब दोन मुलींचं सुकन्या समृद्धी योजनेच खात खोलू शकत.
अर्ज कसा करावा
✅ अर्ज करण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँक मध्ये जा.
✅सुकन्या समृद्धी योजनेच फ्रॉम भरा.
✅आवश्यक कागदपत्रे जोडा.
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- पालकांचे आधार कार्ड / पॅन कार्ड
- पत्त्याचा पुरावा
✅खाते उघडण्यासाठी कमीत कमी ₹250 रुपये भरावे लागतात.
माझी कन्या भाग्यश्री योजना ( Mazi Kanya Bhagyashree Yojana)
माझी कन्या भाग्यश्री योजना 1 एप्रिल 2016 पासून महाराष्ट्र सरकार मार्फत चालू करण्यात आलेली आहे ही योजना मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी त्याच बरोबर मुलींच्या शिक्षणाला पाठवल देण्यासाठी व उज्ज्वल भविष्य बरोबर आरोग्य आणि आर्थिक सुरक्षेसाठी ही योजना चालू करण्यात आलेले आहे.
फायदा
✅ या योजनेमार्फत पहिला दोन मुलींना 50,000 हजार रुपये व विमा मिळतो.
✅ शैक्षणिक हप्त्यामध्ये रक्कम मिळते.
✅ मुलींचे उज्वल भविष्यासाठी व आरोग्य आणि आर्थिक सुरक्षेसाठी योजनेचा मोठा फायदा होतो.
पात्रता
✅ एका कुटुंबात दोनमुली असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. ( जर तुम्हाला पहिली मुलगी झाली त्या नंतर मुलगा झालं तर या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही )
✅ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.50 लाखा पेक्षा कमी असायला पाहिजे.
✅ कुटुंब नियोजन पाळले असावे.
अर्ज कसा करावा
✅ अर्ज करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा.
✅ स्थानिक ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकेची मदत घ्यावी.
✅ आवश्यक कागदपत्रे.
- जन्म प्रमाणपत्र
- उत्पादनचा दाखला
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
लेक लाडकी योजना (Lek ladki yojana)
लेक लाडकी योजनेला १० ऑक्टोबर २०२३ सरकारद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे ही योजना महिला व बालविकास विभागा अंतर्गत चालू करण्यात आलेले आहे या योजने मधून मुलीच्या जन्मापासून ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत व विवाहासाठी टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत देणारे सर्वात चांगले योजना म्हणू शकतो आपण.
फायदा
✅ मुलीच्या जन्माच्या वेळी या योजने मार्फत 5,000 हजार रुपये दिले जातात.
✅ मुलगी 1ली, 6वी, 11वी प्रवेश घेतल्यानंतर अनुक्रमे: ₹4,000 , ₹6,000 ₹8,000 हजार रुपये मिळतात.
✅ मुलीचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 हजार रुपये एक रकमी रक्कम मिळते.
✅ एकूण लाभ 1 लाख रुपये हून अधिक
पात्रता
✅ दोन मुली असणे आवश्यक आहे.
✅ मुलीची जन्म नोंदणी करणे आवश्यक आहे.
✅ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे.
✅ लाभासाठी कुटुंब नियोजन उपयुक्त आहे.
अर्ज कसा करावा
✅ अर्ज करण्यासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत किंवा महिला बाल विकास कार्यालयात जावे.
✅ मुलींच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत अर्ज करा.
✅ आवश्यक कागदपत्रे.
- मुलींचे जन्म प्रमाणपत्र
- पालकांच्या आधार कार्ड
- उत्पादनाचा दाखला
- बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट साईज फोटो
विद्यार्थिनी शिष्यवृत्ती योजना (Vidyarthi Shishyavrutti Yojana)
राज्य शासनाने शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यार्थिनी शिष्यवृत्ती योजना लागू केलेले आहे या मध्ये OBC, ST,SC, व EWS या वर्गातील मुलींना भेटतो.
फायदा
✅ इयत्ता 5वी ते 12वी व महाविद्यालयातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
✅ दरवर्षी ₹1,000 हजार ते ₹12,000 हजार पर्यंत रक्कम दिली जाते.
✅ शिक्षणात कोणत्याही प्रकारचा अडथळा ना यावा म्हणून आर्थिक मदत केली जाते.
पात्रता
✅ विद्यार्थी महाराष्ट्रातला रहिवासी असायला पाहिजे.
✅ OBC/ST/SC/EWS या वर्गातील मुलाना लाभ दिला जाईल.
✅ पालकांचे उत्पन्न वय मर्यादा अंतर्गत असावे.
✅ नियमित शाळा / कॉलेज वर्गात शिक्षण घेतले पाहिजे.
अर्ज कसा करावा
✅ अर्ज करण्यासाठी तुम्हाला गव्हर्मेंट च्या ऑफिशियल वेबसाईट mahadbt.maharashtra.gov.in लॉगिंग करा.
✅ “स्कॉलरशिप” विभागात जाऊन योग्य योजना निवडा.
✅ अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- शाळा / कॉलेज दाखला
- उत्पादनाचा दाखला
- जातीचा दाखला
- आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
Mulinsathi Sarkari Yojana FAQ
Q. महाराष्ट्रात मुलींसाठी सरकारी योजना कोणत्या आहेत?
Ans : सुकन्या समृद्धी योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, लेक लाडकी योजना, विद्यार्थिनी शिष्यवृत्ती योजना या सर्व योजना मुलींच्या उज्वल भविष्यासाठी चालू करण्यात आलेल्या आहे.
Q. मुलींसाठी पोस्ट ऑफिसमधील सर्वोत्तम योजना कोणती आहे?
Ans : मुलींसाठी पोस्ट ऑफिस ची सर्वोत्तम योजन म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर खाते खोलून त्या खात्यावर प्रत्येक महिन्याला फिक्स रक्कम टाकून तुमच्या मुलीचे भविष्य उज्वल करू शकता.
हे पण वाचा 👇👇👇
Spray Pump Subsidy 2025 : स्प्रे पंप खरेदी करण्यासाठी सरकार देतेय 80% सब्सिडी, आवेदन सुरू
Solar Rooftop Subsidy Yojana 2025 : घराच्या छतावर लावा फ्री सोलर पॅनल, आत्ताच अर्ज करा