
खूप सारे शेतकऱ्यांचे स्वप्न असते की त्यांच्याकडे पण एक फळबाग असावी म्हणून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी Bhausaheb fundkar falbag yojana 2026 चालू केलेली आहे. त्यामध्ये विविध फळ बागा आहेत. जसे की आंबा, डाळिंब, संत्रा, मोसंबी, लिंबू, पेरू, सीताफळ, अशा विविध फळबागा आहेत.
आता शेतकऱ्यांचे फळबाग लागवड करण्याचे स्वप्न Bhausaheb fundkar falbag yojana 2026 पूर्ण करून देते या योजने अंतर्गत विविध फळबागांसाठी अनुदान दिले जाते. दिलेल्या अनुदानाचा वापर करून शेतकरी फळबाग लागवड करू शकता.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना बद्दल अजून माहिती जाणून घेण्यासाठी या लेखाला पूर्ण वाचा या लेखांमध्ये Bhausaheb fundkar falbag yojana ची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. म्हणून या लेखाला पूर्ण वाचा.
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2026 Overview
| तपशील | माहिती |
|---|---|
| योजनेचे नाव | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2026 |
| योजना सुरू | करणारी संस्था महाराष्ट्र शासन कृषी विभाग |
| लाभार्थी | मनरेगा अंतर्गत फळबाग लाभासाठी पात्र नसलेले शेतकरी |
| अनुदान | 100% अनुदान (3 हप्त्यांमध्ये) |
| मुख्य उद्देश | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे व फळबाग लागवडीस प्रोत्साहन देणे |
| अर्ज पद्धत | MahaDBT पोर्टलद्वारे ऑनलाइन |
| अधिकृत संकेतस्थळ | MahaDBT Farmer Portal |
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad योजनेचा उद्देश
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवडीसाठी प्रोस्थान देणे व त्यांची उत्पन्न वाढवणे हा आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना डाळिंब, मोसंबी, चिकू, पेरू, सिताफळ अशा इत्यादी फळ पिकांच्या लागवडीसाठी आर्थिक सहायता दिली जाते.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने चे लाभार्थी
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या लाभार्थ्याबद्दल सांगायचं झालं तर या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील पात्र शेतकरी लाभ घेऊ शकता. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला शेतकरी आणि सीमांत शेतकऱ्यांना दिल जाईल.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचे फायदे
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या कायद्याबद्दल सांगायचं झालं तर या योजनेचे फायदे खालील प्रमाणे.
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळते.
- शेतकऱ्यांना पारंपारिक विकासाच्या तुलनेत अधिक नफा मिळवण्याची संधी उपलब्ध होते.
- दुष्काळग्रस्त व कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो.
- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराच्या नवीन संध्या निर्माण होतात.
- शेतकऱ्याचे जीवनमान व आर्थिक परिस्थिती सुधारण्यास खूप मदत होते.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी पात्रता
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी काही पात्रता ठरवण्यात आलेली आहे अर्जदार उमेदवार कडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
📋 अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
📋 अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर शेत जमीन असावी.
📋 आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे अति आवश्यक आहे.
📋 शेतजमिनीची नोंद 7/12 उताऱ्यावर असणे आवश्यक आहे.
📋 अर्जदार शेतकऱ्यांनी अर्ज करण्यापूर्वी फळबाग योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana Required documents (आवश्यक कागदपत्रे)
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
✅ आधार कार्ड
✅ ७/१२ उतारा
✅ ८-अ उतारा
✅ बँक पासबुक झेरॉक्स
✅ हमीपत्र / स्वयंघोषणापत्र
✅ संयुक्त जमीन असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र (NOC)
✅ जातीचे प्रमाणपत्र (फक्त अनुसूचित जाती/जमाती लाभार्थ्यांसाठी)
✅ पासपोर्ट साईज फोटो
✅ मोबाईल नंबर
✅ पाणी उपलब्धतेचा दाखला (लागू असल्यास)
Bhausaheb fundkar falbag yojana Online application 2026 (भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना online अर्ज)
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना मध्ये अर्जदार ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची पूर्ण स्टेप बाय स्टेट माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Step 1 : सर्वात आधी उमेदवारांना महाDBT शेतकरी पोर्टल वर जावे लागेल.
Step 2 : जर तुम्ही नवीन अर्जदार असल्यास New Applicant Registration वर क्लिक करा किंवा लॉगिंग करा.
Step 3 : लॉगिन करून प्रोफाइल 100% पूर्ण झाल्यानंतर कृषी विभागा मध्ये जा.
Step 4 : “भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना” निवडा.
Step 5 : सर्व आवश्यक माहिती भरल्या नंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
Step 6 : अर्ज सबमिट करा आणि अर्ज क्रमांक जतन करून ठेवा.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लाभार्थी निवड प्रक्रिया
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने मध्ये लाभार्थ्यांना खालील पॉईंट नुसार निवड केली जाईल.
- लाभार्थी शेतकऱ्यांनी MahaDBT पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केलाला असवा.
- सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
- शेवटी निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केले जाईल.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नियम व अटी
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये काही अटी व नियम ठेवण्यात आलेले आहे अर्जदार अर्जदार उमेदवाराने खालील सर्व आवश्यक अटी व नियम पाळले पाहिजे.
- अर्जदार शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर शेत जमीन असणे आवश्यक आहे.
- फळबाग लागवड कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या फळपिके अणि लागवड अंतरानुसार आहे.
- लाभार्थी शेतकऱ्यांनी लागवडीनंतर फळबागाची नोंद 7/12 उताऱ्यावर करून घ्यावी.
- फळ बागेची लागवड केल्यानंतर पहिल्या व दुसऱ्या वर्षात झाडमध्ये जिवंतता राखणे बंधनकारक आहे अन्यथा पुढील अनुदान मिळू शकत नाही.
- योजनेमध्ये मिळणारे अनुदान तीन वर्षांमध्ये टप्पे टप्प्याने दिले जाते.
- फळबाग लागवडीसाठी आवश्यक असलेले अतिरिक्त खर्च लाभार्थ्यांनी स्वतः करावा असतो.
- चुकीची माहिती किंवा फर्जी कागदपत्रे आढळल्यास तुमच्या अनुदान रद्द केला जाईल.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचे अनुदान किती आहे?
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजने मधे शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी 100% अनुदान दिले जाते. मिळणारे अनुदान फळांची लागवड आणि निगा राखण्याच्या 3 वर्षे टप्प्याटप्प्याने दिले जाते.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा अर्जाची स्थिती (Application Status) कशी तपासावी?
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर खालील स्टेपनुसार अर्जाची तपासणी करू शकता.
स्टेप 1 : अर्जाची स्थिती पाहण्यासाठी सर्वात आधी शेतकऱ्यांना महाडीबीटी कृषी पोर्टलवर लॉगिन करावे लागेल.
स्टेप 2 : त्यानंतर Track Application Status या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 : तुमचा अर्ज क्रमांक किंवा आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
स्टेप 4 : Search / Submit बटणावर क्लिक करा.
स्टेप 5 : स्क्रीनवर अर्जाची सद्यस्थिती दिसेल.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने मध्ये खालील पात्र शेतकरी अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र राज्यातील वैयक्तिक शेतकरी अर्ज करू शकतात.
अर्जदाराच्या नावावर 7/12 उताऱ्यावर नाव असणे आवश्यक आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
हे पण वाचा 👇👇👇👇
FAQ
Q. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2026 साठी अर्ज सुरू झाले आहेत का?
👉होय, अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
Q. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने मध्ये अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
👉 आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते इत्यादी.
Q. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने मध्ये किती अनुदान मिळते.
👉 या योजने मध्ये लाभार्थ्याला 100% अनुदान दिले जाईल.