
नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ताडपत्री ही अतिशय आवश्यक आहे कारण आपण उन्हाळ्यात पीक कापल्यानंतर आपल्याला घरी अन्य पर्यंत त्याची चांगली देखरेख करावी लागते म्हणजेच अवकाळी पाण्यात वाहून जाऊ नये याची पण काळजी घ्यावी लागते याकरिता सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे ताडपत्री म्हणूनच महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी Tadpatri Anudan Yojana 2026 चालू केलेली आहे.
ताडपत्री असल्यामुळे शेतकऱ्याला त्याचे पीक अवकाळी पाण्यात सुद्धा चांगले ठेवता येईल आणि पाण्यात वाहून पण जाणार नाही म्हणून शेतकऱ्यांना ताडपट्टी असल्याचे अनेक फायदे आहेत.
महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांनी ताडपत्री अनुदान योजनेचा लाभ घेतला पाहिजे. म्हणूनच आज आम्ही या लेखांमध्ये ताडपत्री अनुदान योजनेबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत जसे की ताडपत्री अनुदान योजनेमध्ये अर्ज कसा करावा, अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात, त्याचबरोबर किती लाभ दिला जाईल. सर्व माहिती या लेखांमध्ये भेटून जाईल म्हणून या लेखाला पूर्ण वाचा.
Tadpatri anudan yojana 2026 maharashtra
| घटक | माहिती |
|---|---|
| योजनेचे नाव | Tadpatri anudan yojana 2026 |
| राज्य | महाराष्ट्र |
| संबंधित विभाग | कृषी विभाग, महाराष्ट्र शासन |
| लाभार्थी पात्र | शेतकरी |
| उद्देश | शेतीमालाचे पाऊस, ऊन व इतर हवामानापासून संरक्षण करणे |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज पोर्टल | MahaDBT Portal |
| पात्रता | महाराष्ट्रातील पात्र शेतकरी (योजनेच्या अटीनुसार) |
| अधिकृत वेबसाइट | Maha Schemes / MahaDBT Portal |
ताडपत्री अनुदान योजनेचे उद्देश
Tadpatri anudan yojana 2026 ताडपत्री अनुदान योजनेचे मुख्य उद्देश शेतकऱ्यांना शेतीमालाचे संरक्षण करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे.
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेती मध्ये उपयुक्त कामासाठी ताडपत्री खरेदीसाठी सरकार आर्थिक आसरा देणार आहे.
- शेतकऱ्याला ताडपत्री देऊन शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे .
- शेतकऱ्याला ताडपत्री खरेदी करण्यासाठी आर्थिक परिस्थितीला सामोरे जाऊ नये हे एक मोठे उद्दिष्ट आहे.
- पाण्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाची नासाडी होऊ नये व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी हे देखील या योजनेचे उद्देश आहे.
- ताडपत्री असल्यामुळे शेतकरी शेतीमाल टिकून ठेवू शकतो आणि त्याचे नुकसान पण कमी होईल.
ताडपत्री अनुदान योजने मार्फत मिळणारे अनुदान
ताडपत्री अनुदान योजनेमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना 50% टक्के अनुदान दिले जाते. या योजनेमार्फत जी राशी मिळणार आहे ती राशी DBT च्या साह्याने शेतकऱ्याच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहे.
ताडपत्री अनुदान योजने चे लाभार्थी
खूप सारे शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आला असेल की ताडपत्री अनुदान योजनेचे लाभार्थी कोण आहेत तर खालील प्रमाणे.
- ताडपत्री अनुदान योजनेचे लाभार्थी महाराष्ट्रातील शेतकरी आहेत.
- वैयक्तिक शेतकरी
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी लाभार्थी आहे.
Tadpatri anudan yojana 2026 फायदे
शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदीसाठी शासनाकडून अनुदान मिळते.
✅ शेतीमालाचे पाऊस, ऊन, धूळ आणि ओलाव्यापासून संरक्षण होते.
✅ पिकांचे नुकसान कमी होऊन शेतीमालाची गुणवत्ता टिकून राहते.
✅ शेतीमालाची सुरक्षित साठवण आणि वाहतूक करणे सोपे होते.
✅ अनुदानामुळे शेतकऱ्यांचा ताडपत्री खरेदीवरील आर्थिक खर्च कमी होतो.
✅ नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत होते.
✅ शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते.
Tadpatri anudan yojana 2026 पात्रता
Tadpatri anudan yojana 2026 मध्ये काही पात्रता ठरवण्यात आलेली आहे. अर्जदार शेतकऱ्याकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
📋अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी शेतकरी असावा.
📋अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर शेत जमीन असणे आवश्यक आहे.
📋अर्जदार शेतकऱ्याकडे 7/12 उतारा व 8-अ यांसारखे जमीन मालकीचे कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
📋अर्जदाराचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
📋अर्जदार शेतकऱ्यांनी अर्ज पूर्ण भरून आणि त्याला आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
Tadpatri anudan yojana 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
ताडपत्री अनुदान योजनेसाठी अर्ज करताना सामान्यतः खालील कागदपत्रे आवश्यक असतात:
✅ आधार कार्ड
✅ L 7/12 उतारा
✅ 8-अ उतारा
✅ बँक पासबुकची झेरॉक्स प्रत
✅ पासपोर्ट साईज फोटो
✅ मोबाईल नंबर
✅ पॅन कार्ड
✅ ताडपत्री खरेदीचे GST बिल / पक्की पावती
✅ जात प्रमाणपत्र (आरक्षित प्रवर्गासाठी)
✅ उत्पन्न प्रमाणपत्र
Tadpatri anudan yojana 2026 apply online (ऑनलाइन अर्ज प्रक्रिया)
ताडपत्री अनुदान योजनेमध्ये शेतकरी ऑनलाइन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची पूर्ण प्रोसेस खाली दिलेली आहे खालील प्रोसेस ला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी शेतकऱ्यांना MahaDBT Farmer Portal जावे लागले.
स्टेप 2 : वरील वेबसाईटवर गेल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा किंवा नवीन असेल तर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
स्टेप 3 : लॉगिन केल्यानंतर कृषी विभागाच्या योजनेमधून ताडपत्री अनुदान योजना निवडा.
स्टेप 4 : अर्ज मध्ये सर्व माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 5 : सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
स्टेप 6 : सर्व माहिती तपासून सबमिट बटणावर क्लिक करा.
स्टेप 7 : अर्ज सबमिट केल्यानंतर Application ID जतन करून ठेवा.
ताडपत्री अनुदान योजना 2026 लाभार्थी निवड प्रक्रिया
ताडपत्री अनुदान योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालील प्रमाणे निवडले जाईल.
अर्जदार शेतकऱ्यांनी MahaDBT पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केलेला असावा.
अर्जासोबत दिलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
उपलब्ध निधी आणि शासनाच्या नियमानुसार लाभार्थ्याची निवड केली जाईल.
लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर SMS द्वारे माहिती दिली जाते.
लाभार्थ्याला डीबीटी च्या साह्याने बँक खात्यात अनुदान दिले जाईल.
ताडपत्री अनुदान योजना 2026 नियम व अटी
ताडपत्री अनुदान योजनेमध्ये काही अटी व नियम ठेवण्यात आलेले आहे खालील प्रमाणे.
- अर्जदार हा महाराष्ट्रातला शेतकरी असावा.
- अर्जदार शेतकऱ्याकडे आधार कार्ड, 7/12 उतारा, 8-अ उतारा आणि बँक खात्याशी आधार लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्यांनी दिलेली सर्व माहिती व कागदपत्रे योग्य असावी.
- अर्ज मध्ये चुकीची माहिती किंवा चुकीचे कागदपत्रे दिल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
- अर्जदार शेतकऱ्यांनी याआधी कोणत्याही ताडपत्री अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- शासनाच्या नियमानुसार व आवश्यकतेनुसार नियम व अटींमध्ये बदल होऊ शकतो.
ताडपत्री अनुदान अर्जाची स्थिती (Application Status) कशी तपासावी?
ताडपत्री अनुदान अर्जाची स्थिती पाहण्यासाठी तुम्ही खालील स्टेपला बोलू करून तुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती पाहू शकता.
स्टेप 1 : सर्वात आधी MahaDBT Farmer Portal वर जावे लागेल.
स्टेप 2 : ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर User ID आणि Password टाकून लॉगिन करून घ्या.
स्टेप 3 : त्यानंतर My Applied Schemes पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 4 : ताडपत्री अनुदान योजना निवडा.
स्टेप 5 : त्यानंतर तुम्हाला तुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती स्क्रीनवर दिसेल.
ताडपत्री अनुदान योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी शेतकरी या योजनेमध्ये अर्ज करू शकता.
- स्वतःच्या नावावर शेत जमीन असलेले शेतकरी अर्ज करू शकता.
- महिला शेतकरी देखील अर्ज करू शकता.
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय आणि इतर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकरी अर्ज करू शकता.
हे पण वाचा 👇👇👇
FAQ
Q.Tadpatri Anudan Yojana 2026 साठी अर्ज सुरू झाले आहेत का?
👉होय, अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
Q. ताडपत्री अनुदान योजनेचे अर्ज ऑनलाइन करावा लागेल का?
👉 होय,
Q. ताडपत्री अनुदान योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
👉 महाराष्ट्रातील पात्र शेतकरी यांच्या नावावर शेत जमीन आहे आणि MahaDBT पोर्टलवर नोंदणी केलेली आहे ते शेतकरी या योजनेमध्ये अर्ज करू शकता.
Q. ताडपत्री अनुदान किती मिळते?
👉 ताडपत्री अनुदान योजनेची रक्कम शासनाच्या नियमानुसार दिले जाते.
Q. ताडपत्री अनुदानाचा लाभ कसा मिळतो?
👉 लाभार्थ्याचा अर्ज मंजूर झाल्यानंतर नियमानुसार अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाते.
Q. अर्ज मंजूर न झाल्यास काय करावे?
👉 अर्जाची स्थिती तपासून आवश्यक असल्यास संबंधित कृषी विभाग किंवा MahaDBT हेल्पडेस्कशी संपर्क साधावा.