
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार शेती करण्यासाठी विविध योजना राबवत असतं. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करताना कोणतेही अडचण येऊ नये आणि शेतकऱ्याने मन मोकळे पनाने शेती करावी म्हणूनच महाराष्ट्र सरकारने पाणीटंचाई या मोठ्या समस्याला बघून Shet Tale Anudan Yojana 2026 चालू केलेली आहे.
मागेल त्याला शेततळे अनुदान योजना 2026 अंमोठ्या समस्याला बघूनतर्गत शेतकऱ्यांना पावसाळ्यात पाणी साठवण्यासाठी शेततळे बांधण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते. शेततळे असल्यामुळे सिंचनासाठी वर्षभर पाण्याची उपलब्धता वाढते आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ पण होते. सर्वात मोठा फायदा की दुष्काळी परिस्थितीत पण पिकाचे संरक्षण करता येते आणि शेतकऱ्यांना चांगले पीक पिकवता येते.
म्हणूनच आज आम्ही या लेखांमध्ये Shet Tale Anudan Yojana बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. जसे की योजनेचे उद्देश काय आहे, योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे पात्रता काय पाहिजे आणि अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या लेखाला पूर्ण वाचा.
Shet Tale Anudan Yojana Maharashtra 2026 Overview
| तपशील | माहिती |
|---|---|
| योजनेचे नाव | शेततळे अनुदान योजना 2026 |
| योजना सुरू करणारी संस्था | महाराष्ट्र सरकार |
| लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
| अर्ज पद्धत | Online / Offline |
| अधिकृत संकेतस्थळ | mahadbt.maharashtra.gov.in |
शेततळे अनुदान योजनेचा उद्देश
Shet Tale Anudan Yojana 2026 महाराष्ट्र सरकारचे मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना पावसाळ्यात पाणी साठवून उन्हाळ्यात त्या पाण्याचा सिंचनासाठी प्रभावी वापर करता यावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. कारण महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाणीटंचाई समस्या असल्यामुळे शेती उत्पन्नावर परिणाम होतो याच समस्येला लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने मागेल त्याला शेततळे ही योजना चालू केलेली आहे.
शेततळे अनुदान योजनेअंतर्गत भूजल पाचले वाढवणे, शेती करण्यासाठी वर्षभर पाण्याची उपलब्धता निर्माण करून देणे, त्याचबरोबर दुष्काळ काळात पिकाच्या संरक्षण करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे देखील या योजनेचे सर्वात महत्त्वाचे उद्देश आहे.
Shet Tale Anudan Yojana चे लाभार्थी
शेततळे अनुदान योजनेमध्ये खालील शेतकरी लाभार्थी ठरू शकता.
- अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी असावा.
- शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर शेत जमीन असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- या योजनेमध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), महिला शेतकरी आणि दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
Shet Tale Anudan Yojana फायदे
या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना खालील फायदे मिळू शकतात.
✅ शेतकऱ्याने जर शेततळे बांधले तर पावसाळ्यातले पाणी साठवून वर्षभर सिंचनासाठी वापरता येते.
✅ शेतकऱ्याचे शेती उत्पन्न वाढण्यास मदत होते.
✅ दुष्काळ किंवा पावसाळ्यात पण पिकाला योग्य पाणी देऊन पिकाचे संरक्षण करता येते.
✅ शेततळे असल्यामुळे दुसरे व तिसरी पीक घेण्याची संधी उपलब्ध होते.
✅ पिकाचे नुकसान पण कमी होते आणि शेतकऱ्यांना उत्पन्न पण वाढते.
✅ शेततळे असल्यामुळे शेतकऱ्याला पावसाळ्यातल्या पाण्यावर अवलंबून न राहता शेती करता येते.
✅ उन्हाळ्यात शेतकऱ्याला फळबाग, भाजीपाला आणि नगदी पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन मिळते.
शेततळे अनुदान योजना 2026 पात्रता
शेततळे अनुदान योजनेमध्ये काही पात्रता ठेवण्यात आलेली आहे खालील पात्रता असलेले शेतकरी या योजनेमध्ये अर्ज करू शकता.
📋अर्जदार शेतकरी महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असला पाहिजे.
📋अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे.
📋शेततळ्याखाली येणारे क्षेत्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या मालकीमध्ये असावे.
📋अर्जदार शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे किंवा सामुदायिक शेततळे किंवा इतर कोणत्याही शेततळे अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
📋 महत्त्वाचे म्हणजे शेततळ्यात पाणी अतिरिक्त असल्यास शेतकऱ्याला शेततळ्यातील पाणी शेजारील शेतकऱ्याला सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यासमती द्यावी लागेल.
शेततळे अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे (Shet Tale Anudan Yojana Required documents)
Shet Tale Anudan Yojana 2026 मध्ये अर्ज करताना शेतकऱ्याकडे खालील सर्व अवश्य कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
✅ आधार कार्ड
✅ पॅन कार्ड
✅ जमिनीचा 7/12 उतारा (सातबारा)
✅ 8-अ उतारा
✅ बँक पासबुक झेरॉक्स
✅ जमिनीचा नकाशा (लागू असल्यास)
✅ पासपोर्ट आकाराचा फोटो
✅ मोबाईल क्रमांक
✅ ई-मेल आयडी (असल्यास)
✅ शेतकऱ्याचा फार्मर आयडी (Farmer ID) / महाडीबीटी नोंदणी तपशील
✅ इतर आवश्यक कागदपत्रे (कृषी विभागाच्या सूचनेनुसार)
शेततळे अनुदान योजना 2026 नियम व अटी
शेततळे अनुदान योजनेमध्ये काही अटी व नियम ठेवण्यात आलेले आहे खालील प्रमाणे.
- अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी नसला तर त्याला लाभ दिला जाणार नाही.
- शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे अन्यथा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी इतर कोणत्याही शेततळे अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा अन्यथा शेतकऱ्याला लाभ दिला जाणार नाही.
- अर्ज मध्ये दिलेले सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अचूक असावीत.
- शेततळे अनुदान मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेततळ्याचा वापर केवळ कृषी आणि सिंचन उद्देशानेच करावा.
Shet Tale Anudan Yojana Online Apply (मागेल त्याला शेततळे ऑनलाइन अर्ज )
शेततळे अनुदान योजनेमध्ये शेतकरी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप खाली दिलेली आहे म्हणून खालील प्रोसेस ला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
शेततळे अनुदान योजना 2026 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
Step 1 : सर्वात आधी शेतकऱ्यांना mahadbt.maharashtra.gov.in या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
Step 2 : जर शेतकऱ्याचे महाडीबीटी वेबसाईटवर अकाउंट नसेल तर अकाउंट तयार करून घ्या.
Step 3 : Aadhaar Authentication पूर्ण करा.
Step 4 : त्यानंतर प्रोफाईल मध्ये वैयक्तिक माहिती, पत्ता, बॅंक खाते आणि जमिनीची माहिती भरा.
Step 5 : त्यानंतर कृषी विभाग अंतर्गत चालू असलेल्या “मागील त्याला शेततळे योजना ” या योजनेची निवड करा.
Step 6 : त्यानंतर सर्व आवश्यक माहिती भरून शेततळ्याचा आकार आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
Step 7. वरील सर्व अर्जाची माहिती तपासून सबमिट बटणावर क्लिक करा.
Step 8 : अर्ज सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांक जपून ठेवा जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला अर्ज तपासता येईल.
शेततळे अनुदान योजने च्या अर्जाची स्थिती (Application Status) कशी तपासावी?
अधिकृत वेबसाईट महाडीबीटी भेट द्या. त्यानंतर लॉगिन करून घ्या.
- “Application Status” पर्याय निवडा.
- Application Number टाका.
- अर्जाची सद्यस्थिती पाहा.
शेततळे अनुदान या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
शेततळे अनुदान योजनेसाठी फक्त महाराष्ट्राचे शेतकरी अर्ज करू शकता. इतर राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
शेततळ्यासाठी किती अनुदान मिळते?
महाराष्ट्र शासनामार्फत चालू झालेली योजना मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत शेततळे बांधण्यासाठी सरकार मार्फत ₹50,000 ते ₹75,000 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते.
शेततळे कुठे करावे?
खूप शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न असतो की शेततळे कुठे करावे तर शेततळे आपल्या जमिनीतील खोलगट भागात करावे. शेततळे बांधण्यासाठी जागा निवडताना अशी लक्षात ठेवायचे की जेणेकरून पावसाचे सर्व पाणी तेथे साठले पाहिजे.
हे पण वाचा 👇👇👇
माझी कन्या भाग्यश्री योजना 2026
Tractor Subsidy Scheme 2026: शेतकऱ्यांना मिळणार ₹1.25 लाख ट्रॅक्टर अनुदान
Shabari Gharkul Yojana 2026: अर्ज, पात्रता, कागदपत्रे, लाभार्थी यादी आणि ₹2 लाख घरकुल मदत
FAQ
Q. Shet Tale Anudan Yojana 2026 साठी अर्ज सुरू झाले आहेत का?
👉 होय, अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
Q. अर्ज ऑनलाइन करावा लागेल का?
होय, ऑनलाइन अर्ज करण्याची पूर्ण प्रोसेस वरती दिलेली आहे.
Q. अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
आधार कार्ड, पॅन कार्ड, जमिनीचा 7/12 उतारा (सातबारा), 8-अ उतारा, बँक पासबुक झेरॉक्स, जमिनीचा नकाशा (लागू असल्यास), पासपोर्ट आकाराचा फोटो
Q. शेततळे अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा?
👉 शेततळे अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा किंवा शेतकरी कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता.
Q. शेततळे अनुदान योजनेची लाभार्थी यादी कुठे पाहता येते?
👉 शेतकरी लाभार्थी यादी अधिकृत वेबसाईट महाडीबीटी किंवा संबंधित कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन यादी पाहू शकता.
Q. एका शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त शेततळ्यांसाठी अनुदान मिळू शकते का?
👉 नाही, एका शेतकऱ्याला फक्त एकच वेळा शेततळे अनुदान योजनेचा लाभ मिळू शकतो.