
प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की स्वतःचे घर असावे तर हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आदिवासी समाजातील नागरिकांना शबरी घरकुल योजना राबवलेली आहे. या योजनेअंतर्गत आदिवासी समाजातील नागरिकांना घर बांधण्यासाठी सरकारमार्फत आर्थिक सहाय्यता दिली जाते
Shabari Gharkul Yojana 2026 चे मुख्य उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ज्यांच्याजवळ घर नसलेल्या अनुसूचित जमाती च्या कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक साहित्य देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
शबरी घरकुल योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज कसा करावा, अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात, त्याचबरोबर शबरी घरकुल योजनेसाठी पात्रता काय पाहिजे इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे.
Shabari Gharkul Yojana 2026 Overview
| तपशील | माहिती |
|---|---|
| योजनेचे नाव | शबरी घरकुल योजना |
| योजना सुरू करणारी संस्था | महाराष्ट्र सरकार |
| लाभार्थी | आदिवासी |
| अर्ज पद्धत | Online / Offline |
| अधिकृत संकेतस्थळ | https://www.mahaawaas.org/shabrigr.html |
शबरी घरकुल योजनेचा उद्देश
Shabari Gharkul Yojana 2026 चे उद्देश खालील प्रमाणे.
- शबरी घरकुल योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना व गरजू कुटुंबांना स्वतःचे पक्के घर उपलब्ध करून देणे हे महाराष्ट्र शासनाचे सर्वात मोठे उद्देश आहे.
- महाराष्ट्र सरकारचे सर्वात पहिले उद्देश्य म्हणजे आदिवासी कुटुंबातील बेघर व कच्चे घर असणाऱ्या कुटुंबांना पक्के घर देणे.
- घर बांधण्यासाठी नागरिकांना आर्थिक सहायता उपलब्ध करून देणे.
- ग्रामीण भागातील गरिबी कमी करणे.
Shabari Gharkul Yojana 2026 योजनेचे फायदे
शबरी घरकुल योजनेचे फायदे खालील प्रमाणे.
✅ गरीब आणि बेघर कुटुंबांना राहण्याचे चांगले निवासस्थान मिळते.
✅ शबरी घरकुल योजनेमध्ये मिळणारा लाभ लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यावर जमा केला जातो.
✅ घर नसलेल्या कुटुंबांना किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना घर मिळवण्याची एक नवीन संधी मिळते.
Shabari Gharkul Yojana 2026 लाभार्थी
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा.
- लाभार्थी महाराष्ट्राचा कमी 15 वर्ष रहिवासी असावा.
- लाभार्थ्याकडे स्वतःची जमीन किंवा शासनाने दिलेली जमीन असणे अनिवार्य आहे.
- लाभार्थ्याकडे स्वतःचे किंवा परिवाराचे पक्के घर नसावे.
- विधवा महिला, निराधार व्यक्ती, दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबे आणि यांना निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले जाऊ शकते
- अर्जदार कुटुंबातील वार्षिक उत्पन्न मर्यादित असावे. (ग्रामीण क्षेत्र ₹1 लाख) (नगर परिषद क्षेत्र ₹1.50 लाख) (महानगरपालिका शेत्र ₹2 लाख)
शबरी घरकुल योजना किती पैसे मिळतात
ग्रामीण साधारण क्षेत्र ₹1.32 लाख आणि नक्षलग्रस्त व डोंगरी क्षेत्रात ₹1.42 लाख.
नगरपरिषद क्षेत्रात ₹1.50 लाख
महानगरपालिका क्षेत्रात ₹2 लाख
शबरी घरकुल योजना कागदपत्रे (Shabari Gharkul Scheme Documents)
शबरी घरकुल योजनेमध्ये अर्ज करताना खालील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
✅ आधार कार्ड
✅ पॅन कार्ड
✅ अनुसूचित जमाती (ST) जात प्रमाणपत्र
✅ उत्पन्न प्रमाणपत्र
✅ रहिवासी दाखला
✅ रेशन कार्ड (असल्यास)
✅ बँक पासबुक झेरॉक्स
✅ 7/12 उतारा / जागेचा पुरावा
✅ पासपोर्ट आकार फोटो
✅ मोबाईल नंबर
✅ घर नसल्याचा / कच्च्या घराचा पुरावा (लागल्यास)
शबरी घरकुल योजना 2025 online apply
शबरी घरकुल योजनेमध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
खाली स्टेपला फॉलो करून ऑफलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात जा.
स्टेप 2 : त्यानंतर घरकुल योजनेचा अर्ज फॉर्म घ्या.
स्टेप 3 : वरील दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा
स्टेप 4 : सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे तपासून अर्ज ग्रामपंचायत मध्ये जमा करा.
स्टेप 5 : त्या अर्जाची चांगली तपासणी केली जाईल त्यानंतर पात्र लाभार्थी निवड केली जाईल.
Shabari Yojana Online Form Maharashtra 2026
येथे क्लिक करून शबरी घरकुल योजना अर्ज फ्रॉम PDF डाउनलोड करून घ्या.
👇👇👇👇👇
या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
शबरी घरकुल योजनेमध्ये आदिवासी जमातीतील नागरिक अर्ज करू शकता. इतर प्रवर्गाला मधल्या उमेदवारांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
शबरी घरकुल योजना 2026 यादी
शबरी घरकुल योजनेची यादी बघण्यासाठी तुमच्या ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायत समितीमध्ये चौकशी करा शबरी घरकुल यादी इथेच असते.
ऑनलाइन शबरी घरकुल योजना यादी तपासण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ग्रामपंचायत, गाव निवडून यादी पाहू शकता.
FAQ
शबरी घरकुल योजनेची लाभार्थी यादी कशी पाहायची?
👉 लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुमच्या ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायत समित्यांमध्ये जाऊन यादी पाहू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन यादी आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकते.
शबरी घरकुल योजनेसाठी आधार लिंक असणे आवश्यक आहे का?
👉 होय, लाभार्थ्याचा आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे आवश्यक आहे.
शबरी घरकुल योजना कोणत्या राज्यासाठी आहे?
👉 शबरी घरकुल योजना महाराष्ट्र राज्यातील आदिवासी नागरिकांसाठी राबवले जाते.
शबरी घरकुल योजनेमध्ये किती आर्थिक साहित्य दिली जाते
👉 शबरी घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्यांना 1.32 लाख ते 2 लाखो पर्यंत आर्थिक साहित्य दिली जाते.
हे पण वाचा 👇👇👇👇
Samiti Yojana 2026: ग्रामीण भागात येणार मोठा बदल! तुमच्या गावाचं भविष्य आता तुमच्या हातात