Ramai Awas Yojana 2026: पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, लाभार्थी यादी आणि घरकुल अनुदानाची संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे जे नागरिक स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न बघत होते ते स्वप्न आता पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र शासनाने नवबौद्ध समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी Ramai Awas Yojana 2026 चालू केलेली आहे. या योजने अंतर्गत ज्या परिवारांचे पडीत घर किंवा घरच नाही अशा परिवारांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. 

रमाई आवास योजने ची सुरुवात 15 नोव्हेंबर 2008 पासूनच झालेली आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच कुटुंबाचे या योजने अंतर्गत स्वतःचे पक्के घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण झालेले आहे. 2026 मध्ये देखील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो म्हणून नागरिकांना या योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया पात्रता काय असते आणि आवश्यक कागदपत्रे  कोणती लागतात सर्व माहिती जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. 

या लेखांमध्ये आम्ही रमाई आवास योजना 2026 ची संपूर्ण माहिती देणारा आहोत जसे रमाई आवास योजना पात्रता, रमाई आवास योजना कागदपत्रे, रमाई आवास घरकुल योजना फॉर्म pdf, रमाई घरकुल योजना नियम व अटी आणि इतर सर्व बेसिक माहिती देणार आहोत म्हणून या लेखाला पूर्ण वाचा.

Ramai Awas Yojana 2026 Overview

तपशीलमाहिती
योजनेचे नावRamai Awas Yojana 2026
योजना सुरू करणारी संस्थामहाराष्ट्र सरकार 
अर्ज पद्धतOnline / Offline
ग्रामीण भाग₹1,20 लाख 
डोंगर आणि नक्षलग्रस्त भाग₹1,42 लाख 
शहरी भागा₹2,50 लाख 
अधिकृत संकेतस्थळsjsa.maharashtra.gov.in 




रमाई आवास योजनेचा उद्देश

रमाई आवास योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे हे आहे. जेणेकरून ज्यांच्याकडे घर नाही त्यांना पण स्वतःचे पक्के घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होईल. 

  • रमाई आवास योजनेचे पहिले मुख्य उद्देश म्हणजे जे परिवार बेघर आहे आणि काही परीवार कच्च्या घरात राहता अशा कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्यता देणे. 
  • अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजाच्या राहणीमानाला सुधारणे हे देखील या योजनेची उद्देश आहे. 
  • सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहायता देऊन त्यांना सुरक्षित निवास उपलब्ध करून देणे हा एक या योजनेचा मुख्य उद्देश आहे. 

रमाई आवास योजने चे लाभार्थी

Ramai Swas Yojana 2026 मध्ये खालील पात्र नागरिकांना लाभ दिला जाईल. 

  • या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती (SC) व नवबौद्ध प्रवर्गातील कुटुंबियांना लाभ दिला जाईल. 
  • ग्रामीण आणि शहरी भागातील बेघर कुटुंबे यांना पण लाभ दिला जाईल. 
  • ज्या कुटुंबाकडे पक्के घर नाही आणि ते कच्च्या घरात राहता त्यांना पण या योजनेचा लाभ दिला जाईल. 
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कमीत कमी 15 वर्षे महाराष्ट्राचा निवासी असावा. 

Ramai Awas Yojana 2026 फायदे

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना खालील फायदे मिळू शकतात: 

  •  घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. 
  • ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना ₹1.32 लाखांपर्यंत अनुदान दिले जाते.
  • डोंगराळ व नक्षलग्रस्त भागातील लाभार्थ्यांना ₹1.42 लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. 
  • शहरे भागातील लाभार्थ्यांना ₹2.50 लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळते. 
  • शौचालय बांधकामासाठी ₹12,000 हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते. 

जिल्ह्यानुसार अनुदानाच्या रकमेमध्ये कमतरता किंवा जास्तपणा येऊ शकतो म्हणून अनुदान रक्कम जाणून घेण्यासाठी ग्रामपंचायत ला भेट द्या. 

रमाई आवास योजना पात्रता 

रमाई आवास योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार अनुसूचित जाती (SC) व नवबौद्ध प्रवर्गातील कुटुंबियांना दिला जाईल. 

✅ अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 

✅ महाराष्ट्र राज्यात किमान 15 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. 

✅ एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो. 

✅ अर्जदाराकडे स्वतःची जागा किंवा कच्चे घर असणे आवश्यक आहे. 

✅ ग्रामीण भागातील अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹1.20 लाखांपेक्षा कमी असावे.

✅ शहरी भागातील अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹3 लाखांपेक्षा कमी असावे.

✅ अर्जदाराने यापूर्वी कोणतही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 

रमाई आवास योजना कागदपत्रे (Ramai Awas Yojana Documents)

रमाई आवास योजनेमध्ये अर्ज करताना अर्जदारांकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असावे. 

  • आधार कार्ड 
  •  पॅन कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • मतदान कार्ड 
  • डोमासाईल
  • जातीचा दाखला 
  • उत्पन्न दाखला 
  • 7/12 उतारा
  • घरपट्टी पावती
  • पाणीपट्टी पावती
  • बँक पासबुकची झेरॉक्स
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर 

इतर कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नाही याबाबत स्वयंघोषणापत्र / प्रतिज्ञापत्र

रमाई घरकुल योजना नियम व अटी

Ramai Awas Yojana मध्ये अर्ज करणाऱ्यांसाठी काही अटी व नियम लागू केलेले आहे खालील प्रमाणे. 

  • अर्जदार अनुसूचित जाती (SC) किंवा नवबौद्ध प्रवर्गातला असला पाहिजे.  
  • अर्जदार नागरिक महाराष्ट्रातला कमीत कमी 15 वर्षे वास्तव्य असावे.
  • अर्जदाराकडे पक्के घर नसावे. 
  • लाभार्थ्याच्या नावावर घर बांधण्यासाठी जागा किंवा कच्चे घर असावे. 
  • अर्जदार नागरिकांनी इतर कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 

रमाई घरकुल योजना मध्ये अर्ज करताना नागरिकांनी खोटी माहिती दिल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. 

Ramai Awas yojana marathi apply online ( अर्ज कसा करावा)

रमाई आवास योजनेमध्ये खालील पद्धती नुसार अर्ज केले जातील. 

ग्रामीण भागातील नागरिकांनी ग्रामसभेमध्ये जाऊन रमाई आवास योजना मध्ये अर्ज करावे. त्यानंतर प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला जातो. 

शहरी भागातील नागरिकांनी जवळच्या नगरपालिका किंवा महानगरपालिके मध्ये जाऊन अर्ज करावे. 




Ramai Awas yojana लाभार्थी निवड प्रक्रिया

रमाई आवास योजने मध्ये खालील प्रमाणे लाभार्थ्यांना घरकुल दिले जाते. 

  • पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जातात. 
  • ग्रामसभेमध्ये  अर्जाची छाननी केली जाते. 
  • ग्रामसभा पात्र लाभार्थ्याची निवड करते. 
  • ग्रामसभेमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्याची मंजुरी कार्यकारी, अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील घरकुल निर्माण समितीकडून दिली जाते.

Ramai Awas Yojana List कशी तपासावी?

रमाई आवास योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्यासाठी खालील स्टेपला फॉलो करा. 

स्टेप 1 : रमाई आवास योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी सर्वात आधी pmayg.dord.gov.in  या वेबसाईटला भेट द्या. 

स्टेप 2 : त्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये शेवट खाल्ले जाऊन Beneficiary Details for Verification किंवा लाभार्थी यादी संबंधित पर्यायावर क्लिक करा. 

स्टेप 3 : त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका, गाव आणि कोणत्या वर्षाची यादी पाहायचे आहे ते सिलेक्ट करा त्याचबरोबर योजनेचे नाव सिलेक्ट करून सबमिट बटणावर क्लिक करा. 

खाली तुम्हाला लाभार्थी असलेल्या उमेदवारांची Ramai Awas Yojana List भेटून जाईल. 




 Ramai awas yojana या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

रमाई आवास घरकुल योजनेसाठी अनुसूचित जाती (SC) व नवबौद्ध प्रवर्गातील कुटुंब अर्ज करू शकता. 

रमाई घरकुल योजना किती पैसे मिळतात? 

रमाई घरकुल योजना मध्ये पहिला, दुसरा, तिसरा आणि अंतिम हप्त्यामध्ये अनुदान दिले जाते. 

रमाई आवास योजनेचे अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाते. 

मिळणारे अनुदान बांधकामाच्या घराचे बांधकामाचे प्रगतीनुसार हप्त्यानुसार बँक खात्यात जमा होते 

  • पहिला हप्ता  ₹15,000
  • दुसरा हप्ता ₹45,000 
  • तिसरा हप्ता ₹40,000
  • चौथा हप्ता ₹20,000

हप्त्याची रक्कम जिल्हा नुसार बदलू शकते म्हणून हप्त्याची संपूर्ण रक्कम जाणून घेण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतला भेट द्या. 





हे पण वाचा 👇👇👇 

माझी कन्या भाग्यश्री योजना 2026 

दोन मुलींसाठी सरकारी योजना 2026

Shabari Gharkul Yojana 2026: अर्ज, पात्रता, कागदपत्रे, लाभार्थी यादी आणि ₹2 लाख घरकुल मदत


FAQ

Q.Ramai awas yojana 2026 साठी अर्ज सुरू झाले आहेत का?

👉 होय, अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Q. रमाई घरकुल योजने मध्ये अर्ज ऑनलाइन करावा लागेल का?

👉नाही, तुमच्या गावाच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन अर्ज करू शकतो. 

Q. रमाई घरकुल योजने मध्ये अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

👉आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते इत्यादी.

Q. घरकुल योजनेसाठी कोण पात्र आहे?

👉 घरकुल योजनेसाठी अर्जदार भारताचा नागरिक व महाराष्ट्र रहिवासी असणे आवश्यक आहे. (प्रधानमंत्री आवास योजना किंवा मोदी आवास योजना)

रमाई आवास योजना काय आहे?

👉महाराष्ट्र शासनामार्फत चालू झालेले रमाई आवास योजना ही अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील गरीब व बेघर कुटुंबांसाठी राबवली जाते या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्यता दिली जाते.  










शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment