महा ज्योति योजना 2026 | Mahajyoti tab yojana 



WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


नमस्कार विद्यार्थी  मित्रांनो 10वी पास विद्यार्थ्यांसाठी एक अंदाची बातमी आहे  शासनामार्फत चालू केलेली Mahajyoti tab yojana 2026 योजने मार्फत विद्यार्थ्यांना NEET / MHT-CET फ्री ट्रेनिंग दिले जाणार आहे. 

त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट, सिम कार्ड आणि  दररोज 6 GB इंटरनेट डेटा पुरवला जाणार आहे. हे सर्व साधन देण्याचे सरकारचे उद्देश म्हणजेच ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्याला हे सर्व साधन घेता येत नाही म्हणून सरकार मार्फत त्यांना आर्थिक मदत आणि त्यांच्या उज्वल भविष्य साठी त्याच बरोबर त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी ही सुविधा सरकार देत आहे. 

आज आपण महा ज्योति योजना 2026 योजने बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जसे की या योजनेचे उद्देश काय आहे, आवश्यक पात्रता कोणती पाहिजे आणि आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर अर्ज कुठे करायचा सर्व माहिती देणार आहोत म्हणून या आर्टिकलला लक्षपूर्वक वाचा….




महा ज्योति  योजनेचा उद्देश 

महा ज्योति योजना चालू करायचा सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी ज्यांच्याकडे टॅबलेट किंवा इंटरनेट सुविधा नाही त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी फ्री टॅबलेट , सिम कार्ड आणि  दररोज 6 GB इंटरनेट डेटा पुरवला जाणार आहे.

जेणेकरून विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतील आणि त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना रोजगार निर्माण करायच्या संध्या निर्माण करू शकतील..

महा ज्योति योजनेचे फायदे

महा ज्योति योजनेच्या फायद्याबद्दल सांगितलं गेलं तर या योजनेचे विद्यार्थ्याला खूप फायदा होणार आहे खालील प्रमाणे 

✅ विद्यार्थ्याला फ्री टॅबलेट आणि इंटरनेटचे सुविधा भेटेल.

✅ दररोज 6 जीबी डेटा मोफत मिळेल.

✅ आणि मुख्य म्हणजे कोणतेही डिजिटल साधन नसले तरी विद्यार्थी टॅबलेट चा उपयोग करून घरबसल्या शिक्षण घेऊ शकेल. 

✅ त्याचबरोबर विद्यार्थ्यांना NEET / MHT-CET फ्री ट्रेनिंग दिले जाणार आहे. 

महा ज्योति साठी पात्रतात 

महा ज्योति योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची खालील पात्रता असणे आवश्यक आहे तेव्हा तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकाल आणि अर्ज करू शकाल. 

✅ अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्रातला रहिवासी असेल पाहिजे.

✅ अर्जदार विद्यार्थी OBC, VJNT, SBC प्रवर्गातील असणे आवश्यक आहे तेव्हाच तो पात्र ठरेल.

✅ अर्जदार विद्यार्थी 10वी परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे.

✅ विद्यार्थ्यांनी  11वी मध्ये सायन्स शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा तेव्हा तो पात्र ठरेल. 

✅ अर्जदार विद्यार्थ्यांनी अर्ज करताना शाळेची बोनाफाईड जोडणे अनिवार्य आहे) l.

✅ शहरी भागातील विद्यार्थ्यांची किमान गुणवत्ता 70% असणे आवश्यक आहे. 

✅ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची किमान गुणवत्ता 60% असणे आवश्यक आहे. 

महा ज्योति योजनेच्या अटी व शर्ती 

महा ज्योति योजनेमध्ये काही अटी व शर्ती आढळल्या आहे खालील प्रमाणे. 

अर्जदार विद्यार्थी OBC/VJNT/SBC प्रवर्गातील असला पाहिजे अन्यथा त्याला लाभ दिला जाणार नाही. 

अर्जदार विद्यार्थी 10वी उत्तीर्ण आणि 11वी मध्ये सायन्स फील्ड मध्ये प्रवेश घेतलेला असावा. 


Mahajyoti tab yojana Document (आवश्यक कागदपत्रे )

महा ज्योति योजनेचा आवेदन फॉर्म भरताना तुमच्याकडे खाली सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. 

  • आधार कार्ड 
  • 10वी ची मार्कशीट
  • 11वी सायन्स शाखेचा (बोनाफाईड सर्टिफिकेट)
  • जातीचा दाखल 
  • रवाशी दाखला 
  • दिव्यांग अनंत प्रमाणपत्र ( लागू असेल तर )

महा ज्योति योजना अर्ज प्रक्रिया 2026

मित्रांनो तुम्हाला महा ज्योति योजनेचा अर्ज करायचा आहे तर तुम्हाला खालील सर्व स्टेप ला फॉलो करावे लागेल फॉलो केल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

स्टेप 1 : सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल https://www.mahajyoti.org

स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर Student Registration / Login” या ऑप्शन वर क्लिक करायच आहे.

स्टेप 3 : मध्ये तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल. 

स्टेप 4 : रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्डचा वापर करून OTP टाकून रजिस्ट्रेशन करू शकता.

स्टेप 5 : त्यानंतर तुमच्या पुढे योजनेचा फॉर्म ओपन होईल फॉर्म मध्ये सर्व माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा जसे की आधार कार्ड, जातीचा दाखला, रविवारी दाखला 10वी ची मार्कशीट 

स्टेप 6 : सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर माहिती पुन्हा चेक करा शेवटी फॉर्म ला सबमिट करा. 


FAQ 

Q. महा ज्योति योजना मध्ये आवेदन करण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्र लागतात.

👉   महा ज्योति योजना मध्ये आवेदन करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड , 10वी ची मार्कशीट, 11वी सायन्स शाखेचा (बोनाफाईड सर्टिफिकेट), जातीचा दाखल आणि रवाशी दाखला हे सर्व आवश्यक कागदपत्र लागतील.

Q. महा ज्योति योजनेसाठी आवेदन कुठे करायच. 

👉 महा ज्योति योजनेचा आवेदन https://www.mahajyoti.org वेबसाइट वर करू शकतात.

हे पण वाचा 👇👇👇

Free Atta Chakki Yojana 2026 : सरकार देतेय 100% फायदा, अर्ज करा आत्ता!

Panchayat Samiti Yojana  2026: ग्रामीण भागात येणार मोठा बदल! तुमच्या गावाचं भविष्य आता तुमच्या हातात!

Lakhpati Didi Yojana 2026 : केंद्र सरकार देणार महिलांना 5 लाख रुपये, फक्त महिलांसाठी! लखपती दीदी योजना सुरू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment