Lek Ladki Yojana 2026 : मुलींना मिळणार ₹1,01,000, अर्ज सुरू! पात्रता, फॉर्म PDF व संपूर्ण माहिती

Lek Ladki Yojana 2026, Lek Ladki Yojana 2026 लाभार्थी, Lek Ladki Yojana 2026 फायदे, Lake Ladki Scheme Documents, Lek Ladki Yojana 2026 online apply

Lek Ladki Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



महाराष्ट्र सरकारने मुलींच्या भविष्यासाठी विविध योजना राबवल्या आहेत. मुलींसाठी सरकारी योजना चालू करण्याचे महाराष्ट्र सरकारचे मुख्य उद्देश म्हणजे  मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे शिक्षण वाढण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार विविध योजना राबवत असतं याच सर्व योजनांपैकी महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी Lek Ladki Yojana 2026 चालू केलेली आहे. 

लेक लाडकी योजना 01 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या पात्र मुलींना जन्म पासून ते 18 वर्षे पूर्ण होई पर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्यता केली जाते. लाभार्थी मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण  ₹1,01,000 पर्यंत लाभ दिला जातो. या योजनेचा मुख्य उद्देश मुलांच्या जन्मदर वाढवणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींच्या उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. 

2026 मध्ये पण Lek Ladki Yojana चे ऑनलाइन अर्ज सुरू आहे. आज आम्ही या लेखांमध्ये लेक लाडकी योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज कसा करावा अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात, त्याचबरोबर आवश्यक पात्रता काय पाहिजे इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून या लेखाला पूर्ण वाचा. 




Table of Contents

Lek Ladki Yojana 2026 Overview

तपशीलमाहिती
योजनेचे नावLek Ladki Yojana 2026 
राज्यMaharashtra
विभागमहिला व बाल विकास विभाग
उद्देशमुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, शिक्षणाला चालना देणे व बालविवाह रोखणे
लाभार्थी1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या पात्र मुली
पात्रकुटुंबे पिवळे व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबे
अर्ज पद्धत ऑफलाइन आणि ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळzpbeed.gov.in

लेक लाडकी योजनेचा उद्देश

लेक लाडकी योजनेचे उद्देश खालील प्रमाणे. 

  • लेक लाडकी योजना चालू करण्याचे महाराष्ट्र सरकारचे सर्वात मोठे उद्देश म्हणजे मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देते व राज्यातील मुलींचा जन्मदर वाढवणे. 
  • मुलींच्या आई-वडिलांना मुलींच्या शिक्षणास चालना देऊन त्यांच्या उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
  • मुलींचा बालविवाह थांबवणे आणि 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत शिक्षणात टिकवून ठेवणे. 
  • मुलींचे कुपोषणाचे प्रमाण कमी करणे व मुलींच्या पोषण स्थितीत सुधारणा करणे हे देखील या योजनेचे उद्देश आहे. 
  • गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना आर्थिक आधार देणे आणि त्यांच्या भविष्य सुरक्षित करणे हे देखील या योजनेचे मुख्य उद्देश आहे. 

 Lek Ladki Yojana 2026 लाभार्थी

Lek Ladki Yojana मध्ये खालील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकता. 

✅ महाराष्ट्र राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकता. 

✅ 01 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुली या योजनेचा लाभ घेऊ शकता. 

✅ लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹1 लाखापेक्षा जास्त नसावे.

✅ लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी असावे. 

✅ एका कुटुंबातील फक्त दोनच मुलांना लेक लाडकी योजनेचा लाभ मिळू शकतो. 

✅ जर एखादा कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असेल तरी या योजनेचा लाभ दिला जाईल. 

✅ जुळ्या मुलींना पण या योजनेचा लाभ दिला जाईल. 

Lek Ladki Yojana 2026 फायदे

या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना खालील फायदे मिळू शकतात. 

  • 💵 मुलीला जन्मापासून ते 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने सरकार मार्फत ₹1,01,000 लाख रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. 
  • मुलगी जेव्हा इयत्ता 1 ली, 6 वी आणि 11 वी मध्ये प्रवेश घेतल्यावर या तीनही टप्प्यानुसार आर्थिक मदत केली जाते याच्यामुळे मूळचे शिक्षण पण सुरू राहते. 
  • 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक मोठी रक्कम दिले जाते त्याच्यामुळे शिक्षण सुरू राहते आणि बालविवाह प्रमाण कमी होण्यास मदत होते. 
  • पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांना मुलीच्या संगोपन आणि शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते 

Lek Ladki Yojana 2026 पात्रता 

लेक लाडकी योजनेमध्ये काही पात्रता ठरविण्यात आलेली आहे अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे आवश्यक आहे. 

📋 लाभार्थी मुलगी 01 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्मलेले असावी. 

📋 अर्जदार मुलीच्या कुटुंबाचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे अन्यथा लाभ दिला जाणार नाही. 

📋 अर्जदार महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी असावे. 

📋 अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹ 1 लाख पेक्षा जास्त नसावे जास्त असल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. 

📋 एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोनच मुले या योजनेचा लाभ दिला जाईल. 

📋 एका कुटुंबातील एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलगी या योजनेसाठी पात्र ठरेल आणि एखाद्या कुटुंबात जुळ्या मुली असेल तर त्या पण लेक लाडकी योजनेसाठी पात्र ठरतील. 

📋 लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. 



लेक लाडकी योजना कागदपत्रे (Lake Ladki Scheme Documents)

लेक लाडकी योजनेमध्ये अर्ज करताना अर्जदारांकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हाच सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल. 

✅ मुलीचा जन्म दाखला (Birth Certificate)

✅ मुलीचे आधार कार्ड (असल्यास)

✅ आई व वडिलांचे आधार कार्ड

✅ पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड

✅ उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न ₹1 लाखांपेक्षा कमी असल्याचा पुरावा)

✅ रहिवासी दाखला

✅ बँक पासबुक झेरॉक्स 

✅ पालकांचा मोबाईल नंबर 

✅ मुलीचा व पालकांचा पासपोर्ट आकाराचा फोटो

✅ स्व-घोषणापत्र (Self Declaration)

✅ शाळेत प्रवेश घेतल्यानंतर बोनाफाईड प्रमाणपत्र (संबंधित हप्त्यासाठी)

✅ 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अंतिम लाभासाठी मतदार ओळखपत्र (लागू असल्यास)

हे पण वाचा 👉 दोन मुलींसाठी सरकारी योजना 2026

लेक लाडकी योजना नियम व अटी

लेक लाडकी योजनेमध्ये काही नियम व अटी ठेवण्यात आलेल्या आहे खालील अटींचे पालन करणे अर्जदारांसाठी अति महत्त्वाचे आहे. 

  • लाभार्थी मुलगी 01 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्मलेली असावी. 
  • मुळीचे कुटुंब पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक असणे आवश्यक आहे. 
  • लेक लाडकी योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त दोनच मुलींना मिळू शकतो. 
  • लाभार्थी मुलीचे आणि पालकाचे आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे. 
  • लाभार्थी मुलगी शिक्षण घेत असल्यास पुढील टप्प्याचा आर्थिक लाभ घेण्यासाठी मुलीच्या शालेय प्रवेश पुरावा द्यावा लागेल. 
  • अर्ज करताना योग्य माहिती आणि अचूक कागदपत्रे देणे आवश्यक आहे अन्यथा कारवाई होऊ शकते. 

Lek Ladki Yojana 2026 online apply (लेक लाडकी योजना फॉर्म कसा भरायचा)

लेक लाडकी योजनेमध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खालील स्टेप फॉलो करून  ऑनलाईन अर्ज करू शकता. 

स्टेप 1 : सर्वात आधी https://mahadbt.maharashtra.gov.in/  पोर्टलला भेट द्या.

स्टेप 2 : त्यानंतर जर तुम्ही रजिस्ट्रेशन केले नसेल तर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या किंवा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. 

स्टेप 3 : लॉगिन केल्यानंतर महिला व बाल विकास विभागाचे योजनेमध्ये Lek Ladki Yojana निवडा.

स्टेप 4 : अर्ज मध्ये मुलीची, पालकाची आणि कुटुंबाची आवश्यक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 5 : त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 6 : अर्जाचे सर्व माहिती तपासून Submit बटनावर क्लिक करा. 

स्टेप 7 : अर्ज क्रमांक (Application ID) जपून ठेवा. 

Lek Ladki Yojana 2026 Offline Apply (ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत)

लेक लाडकी योजनेमध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने पण अर्ज करू शकता खालील स्टेपला फॉलो करून. 

  • अर्जदारांनी जवळच्या अंगणवाडी केंद्राला भेट द्या. 
  • लेक लाडकी योजनेचा अर्ज घ्या. 
  • अर्ज ला आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करा. 
  • सर्व माहिती पूर्ण झाल्यानंतर लाभ DBT द्वारे बँक खात्यात जमा केला जाईल. 

लेक लाडकी योजना अर्ज pdf 

लेक लाडकी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी PDF फॉर्म खाली दिलेला आहे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पीडीएफ फाईल डाऊनलोड करा. 

👇👇👇👇👇

Maharashtra Lek Ladki scheme Application Form

हे पण वाचा 👉 माझी कन्या भाग्यश्री योजना 2026

लेक लाडकी योजनेच्या अर्जाची स्थिती (Application Status) कशी तपासावी?

लेक लाडकी योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती तपासणी खूप महत्त्वाची आहे अर्ज मंजूर झाला आहे की नाही अर्जाचे पडताळणी सुरू आहे का किंवा काही अडचण आहे म्हणून अर्जाची स्थितीत तपासने खूप महत्त्वाचे आहे. 

ऑनलाइन अर्जाची तपासणी करण्यासाठी खालील स्टेपला फॉलो करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT ऑफिसर वेबसाईटला भेट द्या. 

स्टेप 2 : युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. 

स्टेप 3 : त्यानंतर “My Applied Schemes” किंवा “Application Status” पर्याय निवडा.

स्टेप 4 : अर्जाची स्थिती Pending, Approved, Rejected किंवा Under Verification अशा स्वरूपात दिसू शकते.

स्टेप 5 : ऑफलाइन अर्ज तपासण्यासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्राला भेट द्या किंवा संबंधित महिला व बाल विकास विभाग कार्यालयात जाऊन अर्जाची तपासणी करू शकता. 

लेक लाडकी योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

लेक लाडकी योजनेमध्ये महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, पिवळे व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांतील 1 एप्रिल 2023 नंतर जन्मल्यामुळे अर्ज करू शकता. 

लेक लाडकी योजना मुलीचे वय किती असावे 

लेक लाडकी योजनेमध्ये कोणतेही निश्चित वय मर्यादा ठरवण्यात आलेली नाही मात्र 01 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना जन्मापासून 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने लाभ दिला जाईल.


लेक लाडकी योजनेचे हप्ते 

मुलीच्या जन्मावेळी₹5,000
इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश₹6,000
इयत्ता 6 वी मध्ये प्रवेश₹7,000
इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश₹8,000
18 वर्षे पूर्ण झाल्यावर₹75,000
एकूण लाभ₹1,01,000

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?

लेक लाडकी योजनेचा अर्ज तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जाऊन करू शकता. 


लेक लाडकी योजना पैसे कधी मिळणार

लेक लाडकी योजने अंतर्गत लाभाची रक्कम एकाच वेळी मिळत नाही तर मुळीच्या शिक्षणाच्या आणि वयाच्या विविध टप्प्यात नुसार 5 हप्त्यांमध्ये रक्कम थेट बँक खात्यात जमा केले जाते. 

लेक लाडकी योजना चालू आहे का?

होय, महाराष्ट्र शासनामार्फत चालू झालेली लेख लाडकी योजना सुरू आहे पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुले 01 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुली या योजनेचा लाभ घेऊ शकता. 


हे पण वाचा 👇👇👇

Shabari Gharkul Yojana 2026: अर्ज, पात्रता, कागदपत्रे, लाभार्थी यादी आणि ₹2 लाख घरकुल मदत

Tractor Subsidy Scheme 2026: शेतकऱ्यांना मिळणार ₹1.25 लाख ट्रॅक्टर अनुदान

Shet Tale Anudan Yojana 2026: ₹75,000 पर्यंत अनुदान, पात्रता, कागदपत्रे व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

FAQ

Q. Lek Ladki Yojana 2026 साठी अर्ज सुरू झाले आहेत का?

👉 होय, अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Q. लेक लाडकी योजनेमध्ये अर्ज ऑनलाइन करावा लागेल का?

👉 या योजनेमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील. 

Q. लेक लाडकी योजनेमध्ये अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

👉 मुलीचा जन्म दाखला (Birth Certificate), मुलीचे आधार कार्ड (असल्यास), आई व वडिलांचे आधार कार्ड, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड इत्यादी.

Q. लेक लाडकी योजनेअंतर्गत एकूण किती लाभ मिळतो?

👉 पात्र मुलींना एकूण ₹1,01,000 लाख रुपयांची आर्थिक सहायता मिळते. 

Q. एका कुटुंबातील किती मुलींना लाभ मिळू शकतो? 

👉 एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळतो. 

Q. मुलगी 1 एप्रिल 2023 पूर्वी जन्मलेली असल्यास लाभ मिळेल का?

👉 नाही, जर मुलगी 01 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुली त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. 

Q. जुळ्या मुलींना योजनेचा लाभ मिळतो का?

👉 होय, एका घरातल्या जुळ्या मुलींना लाभ मिळू शकतो. 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment