कांदा चाळ अनुदान योजना 2026: शेतकऱ्यांना मिळणार ₹1.5 लाखांपर्यंत अनुदान | Kanda Chal Anudan Yojana 2026 

Kanda Chal Anudan Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी बाब म्हणजे कांदा चाळ , कांदा हा नाशिवंत शेतमाला आहे कांद्याची जर जास्त काळ टिकवणूक करायची असेल तर शेतकऱ्यांना  कांदा चाळीची निमित्त अतिशय आवश्यक आहे. 

म्हणून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) अंतर्गत Kanda Chal Anudan Yojana 2026 चालू करण्यात आलेली आहे. 

 या योजनेमध्ये 5 टना पासून ते 1000 टना पर्यंतचा कांदा चाळी शेतकरी, वैयक्तिक शेतकरी, महिला बचत गट किंवा FPO यांना कांदा चाळ उभारता येणार आहे.

नेमकी कांदा चाळीसाठी अनुदान किती देण्यात येणार आहे .

कांदा चाळ अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची पात्रता काय असायला पाहिजे, आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात आणि अर्ज कुठे करावे याची सविस्तर माहिती आपण आज देणार आहोत तर या आर्टिकल ला पूर्ण वाचा. 




Table of Contents

Kanda Chal Anudan Yojana 2026 Overview

तपशीलमाहिती
योजनेचे नाव कांदा चाळ अनुदान योजना 2026
योजना सुरू करणारी संस्थामहाराष्ट्र शासन कृषी विभाग
लाभार्थीमहाराष्ट्रातील पात्र कांदा उत्पादक शेतकरी
अनुदानाचा प्रकार थेट बँक खात्यात जमा
अर्ज पद्धतऑनलाइन
निवड प्रक्रियाअर्ज पडताळणी व पात्र लाभार्थी निवड
अधिकृत पोर्टलमहाडीबीटी (MahaDBT) पोर्टल
योजना लागूराज्य महाराष्ट्र
योजना प्रकारकृषी अनुदान योजना


कांदा चाळ अनुदान योजना 2026 म्हणजे काय? (Kanda Chal Anudan Yojana )

Kanda Chal Anudan Yojana 2026 म्हणजे काय तर कांदा चाळ अनुदान योजना महाराष्ट्र सरकारने चालू केलेली महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा फायदा घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा ठेवण्यासाठी स्टोरेज उपलब्ध करून देणे जेणेकरून कांदा उत्पादक शेतकरी कांद्याला चांगला भाव आला तेव्हा विकू शकतील आणि जेव्हा कांद्याचा कमी भाव असतो तेव्हा त्या स्टोरेज मध्ये ठेऊ शकतील. 

कांदा चाळ अनुदान योजने मध्ये मिळणाऱ्या अनुदान

मित्रांनो कांदा चाळ अनुदान योजनेमध्ये मिळणाऱ्या अनुदाना बद्दल सांगायचे झाले तर या मध्ये 5 टना पासून ते 25 टना पर्यंत शेतकऱ्यांना 10,000 हजार प्रति टन  या दराने अनुदान दिलं जाते. 

5 टना ची कांदा चाळ  उभी करण्यासाठी कमीत कमी 50 हजार अनुदान दिले जाणार आहे .

तर 25  टनाची कांदा चाळ भरण्यासाठी अडीच लाख रुपये अनुदान देण्याची शक्यता आहे. 

याच्या नंतर शेतकऱ्यांना 25  टना पासून साधारणपणे 500 मॅट्रिक टनापर्यंत शेतकऱ्यांना 8000 प्रति टन अनुदान देण्यात येणार आहे. 

500 ते 1000 टनासाठी  6000 प्रति टन इतके अनुदान देण्यात येणार आहे 

कांदा चाळ अनुदान  योजनेचा उद्देश

कांदा चाळ अनुदान योजनेचे उद्देश खालील प्रमाणे. 

  • कांदा चाळ असल्यामुळे शेतकरी जास्त कालावधीसाठी कांदा सुरक्षित ठेवू शकता. 
  • कुजणे, वजन घटने यामुळे होणारे नुकसान कमी करणे हे देखील या योजनेचा उद्देश आहे. 
  • कांदा चाळ असल्या मुळे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळू शकतो कारण जेंव्हा कमी भाव असल्यास कांदा साठवून ठेव्याचा आणि नंतर चांगल्या दराने विक्री करावी ज्या मुळे शेतकऱ्या मोठा फायदा होईल. 

कांदा चाळ अनुदान योजने चे लाभार्थी

कांदा चाळ अनुदान योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट आणि कृषी संस्थांना दिला जातो. या योजने मुले शेतकऱ्यांना आधुनिक कांदा चाळ उभारत येते. 

Kanda Chal Anudan Yojana फायदे

Kanda Chal Anudan Yojana 2026 फायदे खालील प्रमाणे. 

✅ कांदा चाळ असल्यामुळे कांदा सुरक्षित आणि जास्त कालावधीसाठी साठवून ठेवता येतो. 

✅ साठवणुकीदरम्यान  कुजणे व वजनातील घट कमी होते. 

✅ कांद्याचे चांगलेपणा जास्त वेळ साठी टिकून ठेवता येते. 

✅ कांद्याचे बाजार भाव कमी असल्यास कांदा साठवून ठेवता येतो. 

✅ कांद्याला योग्य बाजारभाव मिळाल्यामुळे योग्य वेळी कांदा विक्रीकरण अधिक नफा मिळवता येतो. 

✅ कांदा चाळ असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. 

✅ कांद्याच्या भाव दरातील चढ उतारात शेतकऱ्याला कमी फटका बसतो. 

✅ कांदा चाळ बांधण्यासाठी शासनामार्फत आर्थिक साहित्यात दिली जाते. 


Kanda Chal Anudan Yojana पात्रता

कांद्याचा अनुदान योजनेमध्ये काही पात्रता ठेवण्यात आलेली आहे अर्जदार उमेदवारकडे खालील सर्व पात्रता असणे आवश्यक आहे. 

📋 अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा. 

📋 अर्जदार हा शेतकरी असावा व त्याच्या नावावर शेत जमीन असावी. 

📋 अर्जदाराने कांदा पिकाची लागवड केलेली असावी. 

📋 अर्जदार शेतकऱ्याकडे कांदा चाळ उभारण्यासाठी आवश्यक जागा असावी. 

📋 अर्जदाराकडे 7/12 उतारा व 8-अ उतारा असणे आवश्यक आहे. 

📋 अर्जदारांनी यापूर्वी कोणत्याही कांदा चाळ अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 


Kanda Chal Anudan Yojana Required Documents (कांदा चाळ अनुदान योजना 2026 कागदपत्रे)

Kanda Chal Anudan Yojana 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे महत्त्वाचे आहे. 

✅ आधार कार्ड 

✅ 7/12 उतारा

✅ 8-अ उतारा

✅ रहिवासी दाखला

✅ बँक पासबुक झेरॉक्स 

✅ पासपोर्ट साईज फोटो 

✅ मोबाईल नंबर 

✅ ई-मेल आयडी 

✅ कांदा पिकाची लागवड केल्याचा पुरावा असावा. 

✅ जातीचा दाखला 

कांदा चाळ अनुदान योजना 2026 आवेदन प्रक्रिया (Kanda Chal Anudan Yojana 2026 Apply Online )

कांदा चाळ अनुदान योजने मध्ये नागरिक खालील स्टेप ला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करू शकता. 

स्टेप 1 : कांदा चाळ अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला गोरमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट महाडीबीटी जावे लागेल.

स्टेप 2 : mahadbt.maharashtra.gov.in  या गोरमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीने किंवा आधार कार्ड लॉगिन करा. 

स्टेप 3 : लॉगिन केल्यानंतर नवीन एक पेज ओपन होईल त्यानंतर तुम्हाला 5 ऑप्शन दिसतील त्या मध्ये फलोत्पादन वर क्लिक करा.

स्टेप 4 : क्लिक केल्यानंतर नवीन एक पेज ओपन होईल त्यामध्ये बॉक्स बॉक्स येतील ती सर्व माहिती लक्षपूर्वक वाचा आणि लक्षपूर्वक भरा.

स्टेप 5 : सर्व माहिती लक्षपूर्वक भरल्यानंतर अर्ज जतन करा या ऑप्शनवर क्लिक करा

स्टेप 6 : सदर अर्ज जतन केल्यानंतर या अर्जासाठी तुम्हाला 24 रुपये पे करावे लागतील तरच हा अर्ज सबमिट होईल. 

स्टेप 7 : अशाच प्रकारे तुम्ही कांदा चाळ अनुदान योजनेसाठी आवेदन करू शकता.

 कांदा चाळ अनुदान योजना लाभार्थी निवड प्रक्रिया

कांदा चाळ अनुदान योजनेमध्ये लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची तपासणी केली जाईल त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारण्यासाठी अनुदान मंजूर केले जाईल आणि अनुदाना मार्फत दिले जाणारे रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा केली जाईल. 

Kanda Chal Anudan Yojana नियम व अटी

कांद्याचा अनुदान योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या नागरिकांसाठी काही नियम व अटी ठेवण्यात आलेले आहे खालील प्रमाणे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे नसेल तर लाभ दिला जाणार नाही. 
  • अर्जदाराच्या नावावर शेतजमीन असणे अति आवश्यक आहे अन्यथा लाभ दिला जाणार नाही. 
  • अर्जदाराचे 7/12 उताऱ्यावर नाव असणे बंधनकारक आवश्यक आहे. 
  • अर्जदार कांदा उत्पादक शेतकरी असावा. 
  • अर्जदार शेतकऱ्याकडे कांदाचाळ उभारण्यासाठी स्वतःची जागा असावी. 
  • अर्जदाराचे अर्ज मंजूर झाल्यानंतर कांदा चा उभारणे सुरू करावे. 
  • अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. 
  • अर्जामध्ये चुकीची माहिती किंवा चुकीचे कागदपत्रे असल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. 

कांदा चाळ अनुदान योजनेच्या अर्जाची स्थिती (Application Status) कशी तपासावी?

कांदा चाळ अनुदान योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती तपासण्यासाठी अर्जदार खालील स्टेपला फॉलो करू शकता. 

स्टेप 1 : सर्वात आधी mahadbt.maharashtra.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर लॉगिन करा. 

स्टेप 2 : युजर आयडी आणि पासवर्ड टाकून खाते ओपन करा. 

स्टेप 3 : त्यानंतर “My Applied Schemes” या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 4 : कांदा चाळ अनुदान योजनेचा अर्ज निवडा. 

स्टेप 5 : त्यानंतर अर्ज समोर दिसणाऱ्या Application Status पर्यायावर क्लिक करा. 

स्टेप 6 : खाली तुम्हाला अर्जाची स्थिती लक्षात येऊन जाईल. 

कांदा चाळ अनुदान योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

कांदा चाळ अनुदान योजनेसाठी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी, महिला शेतकरी, शेतकरी गट, FPO, FPC आणि कृषी संस्था पण कांदा चाळ अनुदान योजनेमध्ये अर्ज करू शकता. 

कांदा चाळ अनुदान किती आहे?

कांदा चाळ उभारण्यासाठी शासनाकडून एकूण खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त एक लाख 50 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते. 

कांदा चाळ उभारणीसाठी कोणती योजना आहे?

कांदा चाळ उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत ‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान’ (MIDH) आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना राबवल्या जातात. 

कांद्याचे पीक किती दिवसाचे असते?

कांद्याचे पीक लागवडीपासून साधारणपणे 90 ते 120 दिवसाच्या असते. म्हणजेच बियाणे पासून लागवड केल्यास पूर्ण कांदा तयार होण्यासाठी 130 ते 150 दिवसाचा कालावधी लागतो. 

हे पण वाचा 👇👇👇

शेळीपालन अनुदान योजना 2026 

पाईपलाईन अनुदान योजना 2026 

सोलर पंप योजना 2026 

रमाई आवास योजना 2026

FAQ

Q.Kanda Chal Anudan Yojana 2026 साठी अर्ज सुरू झाले आहेत का?

👉 होय, अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Q. कांदा चाळ अनुदान योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो? 

👉 कांदा चाळ अनुदान योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी, महिला शेतकरी आणि FPO, FPC अर्ज करू शकता. 

Q. कांदा चाळ अनुदान योजनेचा अर्ज कुठे करावा लागतो?

👉 कांदा चाळ अनुदान योजनेचा अर्ज शेतकरी mahadbt.maharashtra.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन करू शकता.

Q. कांदा चाळ उभारण्यासाठी स्वतःची जागा असणे आवश्यक आहे का?

👉 होय, कांदा चाळ उभारण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची शेत जमीन असणे अति आवश्यक आहे. 

Q. महिला शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात का?

👉होय, कांदा अनुदान योजनेमध्ये महिला शेतकरी पण अर्ज करू शकता. 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment