Solar Pump Yojana Maharashtra 2026: 95% अनुदानावर मिळणार सोलर पंप, अर्ज सुरू! पात्रता व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Solar Pump Yojana Maharashtra
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विविध योजना राबवल्या आहेत ज्यांच्यामुळे शेतकऱ्याला शेती करताना कोणताही अडथळा येत नाही त्याच योजनेपैकी महाराष्ट्र सरकारने Solar Pump Yojana Maharashtra चालू केलेले आहे. 

मागेल त्याला सोलर पंप या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्याचा वीज बिल खर्च कमी होतो आणि दिवसा सिंचन करणे शक्य होते. ज्याच्यामुळे शेतकऱ्याचा नफा वाढतो. 

सोलर पंप योजना 2026 मध्ये शेतकऱ्यांना अनुदानावर लाभ देण्यात येत असून अर्ज प्रक्रिया चालू आहे म्हणूनच आम्ही या लेखामध्ये सोलर पंप योजनेमध्ये अर्ज कसा करावा, अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे, अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात, त्याचबरोबर इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून या लेखाला पूर्ण वाचा. 

Table of Contents

Solar Pump Yojana maharashtra 2026 Overview

तपशीलमाहिती
योजनेचे नाव Solar Pump Yojana maharashtra
योजना सुरू करणारी संस्थामहाराष्ट्र सरकार 
लाभार्थीमहाराष्ट्र राज्याचे शेतकरी 
अर्ज पद्धतOnline
अधिकृत संकेतस्थळ mahadiscom.in 


सोलर पंप योजनेचा उद्देश

महाराष्ट्र सरकारचे सोलर पंप योजना चालू करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौरऊर्जेवर चालणारी पंप उपलब्ध करून देणे ज्याच्यामुळे शेतकऱ्याला वीज किंवा डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल आणि शेतकऱ्याला शेती करताना कोणताही अडथळा येणार नाही याच उद्देशाने महाराष्ट्र सरकारने मागील त्याला सोलर पंप योजना चालू केलेली आहे. 

Solar Pump Yojana 2026 चे लाभार्थी

सोलर पंप योजनेचा लाभ खालील शेतकऱ्यांना दिला जातो. 

  • ज्या शेतकऱ्याच्या नावावर शेत जमीन आहे ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकता. 
  • डिझेल पंप चा वापर करणारे शेतकरी. बोअरवेल, विहीर किंवा इतर पाण्याचा स्रोत असलेले शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत.
  • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर पात्र प्रवर्गातील शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत. 

Solar Pump Yojana maharashtra चे फायदे

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना खालील फायदे मिळू शकतात:

✅ सोलर पंप असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा पण सिंचनासाठी वीज मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री पाणी देण्याची गरज पडत नाही. 

✅ सौरऊर्जेवर पंप चालत असल्याने शेतकऱ्याचा विज बिल आणि डिझेलचा खर्च कमी होतो म्हणजेच शून्य होतो.

✅ शेतकऱ्यांना सोलर पंप खरेदीसाठी 90%  ते 95 प्रतिशत% पर्यंत सरकार मार्फत अनुदान दिले जाते. 

✅ सोलर पंप लावल्याने सोलर सिंचनासाठी खर्च देखिल कमी लागते. 

✅ सोलर पंप असल्यामुळे शेतकऱ्याचे कमी खर्चा त सिंचाई पूर्ण होते. 

Solar Pump Yojana maharashtra 2026 पात्रता 

सोलर पंप योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने काही पात्रता ठरवलेले आहे अर्जदार शेतकऱ्याकडे खालील सर्व पात्रता असणे आवश्यक आहे तेव्हाच शेतकऱ्याला सोलर पंप योजनेचा लाभ दिला जाईल. 

📋अर्जदार शेतकरी महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असला पाहिजे. 

📋 अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे. 

📋 शेतकऱ्याकडे विहीर, बोअरवेल, शेततळे, नदी किंवा कालवा यांसारखा कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत असणे आवश्यक आहे. 

📋 एका शेतकऱ्याला एकच वेळा सोलर पंप योजनेचा लाभ दिला जातो. 

📋 आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. 

Solar Pump Yojana maharashtra 2026 Required documents (आवश्यक कागदपत्रे)

सोलर पंप योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे तेव्हाच शेतकरी सोपे पद्धतीने या योजनेमध्ये अर्ज करू शकतो. 

✅ आधार कार्ड 

✅ पॅन कार्ड 

✅ 7/12 उतारा

✅ जातीचा दाखला 

✅ पासपोर्ट साईज फोटो 

✅ बँक पासबुक झेरॉक्स 

✅ मोबाईल नंबर 

✅ ईमेल आयडी 

✅ जमीन, विहीर किंवा पाण्याचा स्रोत संयुक्त मालकीचा असल्यास इतर भागधारकांचे NOC आवश्यक आहे. 

सोलर पंप योजना 2026 नियम व अटी

सोलर पंप योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने काही अटी व नियम ठेवलेले आहे सर्व अटी व नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. 

  • अर्जदार शेतकरी महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असला पाहिजे जर शेतकरी इतर राज्याचा असेल तर त्याला लाभ दिला जाणार नाही. 
  • अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे अन्यथा लाभ दिला जाणार नाही. 
  • अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी कोणत्याही सोलर पंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा अन्यथा शेतकऱ्याला लाभ दिला जाणार नाही. 
  • एका शेतकऱ्याला फक्त एकाच वेळा सोलर पंप अनुदान दिले जाईल. 

Solar Pump Yojana maharashtra Apply Online (ऑनलाइन अर्ज प्रक्रिया)

सोलर पंप योजनेमध्ये अर्जदार खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करू शकता..

Step 1 : सर्वात आधी शेतकऱ्यांना  kusum.mahaurja.com ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल. 

Step 2 : वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, जिल्हा, तालुका, गाव निवडून इतर अजून माहिती निवडा. 

Step 3 : त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

Step 4 : सर्व माहिती तपासून अर्ज फॉर्म सबमिट करा. 

Step 5 : सर्व पात्र पडताळणी नंतर पेमेंट ची सूचना मिळाल्यास ऑनलाइन पेमेंट करा.

सोलर पंप योजनेच्या अर्जाची स्थिती (Application Status) कशी तपासावी?

शेतकऱ्यांनी सोलर पंप योजनेसाठी अर्ज केलेला आहे तर अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्याने Kusum Beneficiary ॲप डाउनलोड करायची आहे या app द्वारे अर्जाची स्थिती पाहू शकता त्याचबरोबर त्यात मध्ये तक्रार पण नोंदवू शकता. 

सोलर पंप योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

✅ महाराष्ट्रातील वैयक्तिक शेतकरी या योजने मध्ये अर्ज करू शकतात. 

✅ ज्या शेतकऱ्याचा नावावर शेती जमीन आहे ते शेतकरी अर्ज करू शकत. 

✅ सीमांत शेतकरी, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर पात्र प्रवर्गातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकता. 

महाराष्ट्रात सौर पंप योजना कोणती आहे?

महाराष्ट्र मध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजना Magel Tyala Saur Krushi Pump Yojana) ही महाराष्ट्रातील मुख्य सौर पंप योजना राबवली आहे 

‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’ साठी अर्ज कसा करावा?

‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ मध्ये अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरणच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल किंवा वरील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

हे पण वाचा 👇👇👇👇👇

Shet Tale Anudan Yojana 2026: ₹75,000 पर्यंत अनुदान, पात्रता, कागदपत्रे व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

Ramai Awas Yojana 2026: पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, लाभार्थी यादी आणि घरकुल अनुदानाची संपूर्ण माहिती 

Tractor Subsidy Scheme 2026: शेतकऱ्यांना मिळणार ₹1.25 लाख ट्रॅक्टर अनुदान 

FAQ

Q.सोलर पंप योजना 2026 साठी अर्ज सुरू झाले आहेत का?

👉होय, अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Q. सोलर पंप योजने मध्ये अर्ज ऑनलाइन करावा लागेल का?

👉होय,

Q. अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

👉आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते इत्यादी.

Q. लाभार्थी यादी कुठे पाहता येईल?

👉अधिकृत संकेतस्थळावर. 

Q. सोलर पंपासाठी किती अनुदान मिळते?

👉  सोलर पंप योजनेमध्ये अनुदान पंपांच्या क्षमतेवर असते जसा पंप त्यानुसार अनुदान दिले जाते परंतु काहीही लाभार्थ्याला भरावा लागतो. 

Q कोणकोणते सोलर पंप उपलब्ध आहेत?

👉 शासनामार्फत साधारणपणे  3 HP, 5 HP आणि 7.5 HP क्षमतेचे सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जातात.

अर्ज नाकारला गेल्यास पुन्हा अर्ज करता येतो का?

👉होय, जर तुमचा अर्ज नाकारला असेल तर तुम्ही अवश्य कागदपत्रे आणि योग्य माहिती देऊन पुन्हा अर्ज करू शकता. 




शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment